माधुरी-रितेशचा ‘काचा बादाम’! | पुढारी

माधुरी-रितेशचा ‘काचा बादाम’!

पुढारी ऑनलाईन : माधुरी दीक्षित किती गुणी नर्तकी आहे हे आता नव्याने सांगण्याची गरज नाही. रितेश देशमुखबरोबर तिने आता ‘काचा बादाम’ या व्हायरल गाण्यावर सुंदर नृत्य करून नेटकर्‍यांचे लक्ष वेधून घेतले.

रितेशचा ‘सेन्स ऑफ ह्युमर’ म्हणजेच विनोदबुद्धी अतिशय चांगली आहे. त्याचे चित्रपटच नव्हे तर पत्नी जेनेलियासमवेत त्याने केलेले रिल्सही याची साक्ष देतात. त्याने माधुरीसमवेत या काही सेकंदांच्याच व्हिडीओमध्येही विनोदी हावभाव दाखवले आहेत.

हा व्हायरल झालेला व्हिडीओ स्वतः माधुरीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला. हा व्हिडीओ ‘द फेम गेम’ या चित्रपटाच्या सेटवरील आहे. पश्‍चिम बंगालमधील भुबन बड्याकर या शेंगदाणा विक्रेत्याने आपल्या शेंगदाण्यांची विक्री करण्यासाठी बनवलेले हे गाणे आता देश-विदेशात लोकप्रिय झाले आहे.

हे्ही

Back to top button