औरंगाबाद : लाच म्हणून मागितला चक्क ‘दारूचा खंबा’, लिपिकास अटक | पुढारी

औरंगाबाद : लाच म्हणून मागितला चक्क 'दारूचा खंबा', लिपिकास अटक

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : घराचा थकीत मालमत्ता कर कमी करून देण्यासाठी पाच हजार रुपये अन दारूचा खंबा (७५० ml ची विदेशी दारूची बाटली) मागणााऱ्या लिपिकास अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे. प्रभू लक्ष्मण चव्हाण (वय ५२ वर्ष, पद मनपा करआकारणी लिपिक, रा. सुलतानपूर, ता. खुलताबाद, जि. औरंगाबाद) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

तक्रारदार यांच्या घराचा थकीत मालमत्ता कर कमी करून देण्यासाठी मनपा कर आकारणी लिपिक प्रभू चव्हाण याने ३० मार्च रोजी पाच हजार रुपये आणि विदेशी दारूची (७५० ml बाटली)  मागणी केली होती. तसेच, त्याच दिवशी पंधराशे रुपये लाच स्वीकारली.

३१ मार्च रोजी उर्वरित साडेतीन हजार रुपये रोकड आणि दारूची बाटली लाच म्हणून स्वीकारताना एसीबी पथकाने चव्हानला पकडले.

Back to top button