Nashik : चांदवडच्या रंगमहालाला मिळणार गतवैभव

चांदवड रंगमहाल,www.pudhari.news
चांदवड रंगमहाल,www.pudhari.news

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा ; मुंबई- आग्रा महामार्गावरील सह्याद्रीच्या पर्वत रांगेत वसलेल्या चांदवड येथील होळकरवाडा अर्थात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या रंगमहालाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी राज्य सरकारने पर्यटन विकास योजने अंतर्गत पाच कोटींचा निधी मंजूर केला आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. (Nashik)

सध्या हा वाडा पुरातत्त्व खात्याकडे दुरुस्तीसाठी असल्याने तो पर्यटकांसाठी बंद आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे व राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी पाच कोटी निधी दिल्यामुळे दुरुस्तीचे काम लवकरच पूर्ण होऊन रंगमहाल होळकरप्रेमी व पर्यटकांसाठी लवकरच खुला होईल, अशी आशा सर्वांना लागली आहे. 2009 ते 2014 या काळात पालकमंत्री छगन भुजबळ यांनी रंगमहालाच्या पुनर्विकासासाठी 15 कोटी रुपये मंजूर केले होते. (Nashik)

20 मार्च रोजी पुण्यश्लोक फाउंडेशनच्या वतीने नाशिक येथील कालिदास कलामंदिरात आयोजित हिंदुस्थानचा युगपुरुष मल्हारराव होळकर जन्मोत्सव व राज्यमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांचा नागरी सत्कार सोहळा झाला. यावेळी ना. भुजबळ व ना. भरणे यांच्याकडे चांदवड येथील होळकर वाडा अर्थात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या रंगमहालाचे संवर्धन करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावेळी यात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर यासाठी निधी मंजूर झाल्याची माहिती पुण्यश्लोक फाउंडेशनचे अध्यक्ष धनंजय तानले व शिवाजी ढेपले यांनी दिली आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news