Neeraj Pandey : ‘ऑपरेशन रोमियो’ची चर्चा, रिलीज डेट आली समोर | पुढारी

Neeraj Pandey : 'ऑपरेशन रोमियो'ची चर्चा, रिलीज डेट आली समोर

पुढारी ऑनलाईन डेस्क

नीरज पांडे (Neeraj Pandey) यांच्या प्रोडक्शचा चित्रपट ऑपरेशन रोमियोची रिलीज डेट समोर आलीय. या चित्रपटाचे दिग्दर्शक शशांत शाह यांनी केले आहे. या चित्रपटामध्ये सिद्धांत गुप्ता, वेदिका पिंटो, शरद केळकर आणि भूमिका चावला मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचा ट्रेलर १ एप्रिलला म्हणजेच आज रिलीज होणार आहे. (Neeraj Pandey)

ऑपरेशन रोमियोचं पोस्टर

बॉलिवूडमध्ये ‘अ वेंड्नसडे’, ‘स्पेशल २६’, ‘बेबी’ आणि ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ यासारखे उत्तम चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते नीरज पांडे यांनी आणलेत. ‘ऑपरेशन रोमियो’ २२ एप्रिल रोजी चित्रपटगृहामध्ये रिलीज होणार आहे. निर्मात्यांनी गुरुवारी ३१ मार्च रोजी याची घोषणा केलीय. चित्रपटामध्ये सिद्धांत गुप्ता आणि वेदिका पिंटो मुख्य भूमिकेत आहेत.

शशांत शाह यांच्या दिग्दर्शनाखाली असलेला हा ड्रामा चित्रपट नीरज पांडे आणि शीतल भाटिया यांची कंपनी फ्रायडे फिल्मवर्क्स आणि रिलायन्स एंटरटेनमेंटने प्रोड्यूस केलं आहे. फ्रायडे फिल्मवर्क्सने इन्स्टाग्रामवर चित्रपटाचे एक मोशन पोस्टर रिलीज केलं आहे. चित्रपटाचा ट्रेलर १ एप्रिल रोजी रिलीज होणार आहे.

या चित्रपटामध्ये सिद्धांत गुप्ता आणि वेदिका पिंटो शिवाय शरद केळकर, भूमिका चावला आणि किशोर कदम हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. याआधीही नीरज पांडेने ‘टोटल सियापा’, ‘रुस्तम’, ‘सात उचक्के’, ‘नाम शबाना’, ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’ यासाररखे चित्रपट प्रोड्यूस केले आहेत. त्यांचेच प्रोडक्शन असणारा पुढील चित्रपट ‘विक्रम वेधा’ चा हिंदी रीमेक येणार आहेय या चित्रपटात ऋतिक रोशन आणि सैफ अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sharad Kelkar (@sharadkelkar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sharad Kelkar (@sharadkelkar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sharad Kelkar (@sharadkelkar)

Back to top button