मनसे च्या पाडवा मेळाव्यास मालेगावातून एक हजार कार्यकर्ते होणार रवाना | पुढारी

मनसे च्या पाडवा मेळाव्यास मालेगावातून एक हजार कार्यकर्ते होणार रवाना

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा ; येत्या 2 एप्रिल रोजी मुंबई येथे शिवतीर्थावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गुढीपाडवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मनसेचा गुढीपाडवा मेळावा दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होणार आहे. त्यासाठी मनसे सज्ज झाली आहे. तयारीचा वेग वाढवला असून, या मेळाव्यानिमित्त राज ठाकरे काय बोलणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. या मेळाव्यास मालेगाव शहर व तालुक्यातून सुमारे एक हजार कार्यकर्ते रवाना होणार असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष राकेश भामरे यांनी दिली.

या मेळाव्यास मालेगाव शहर व तालुक्यातील पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भामरे यांनी केले. या अनुषंगाने मंगळवारी (दि.29) येथील कॅम्प रोडवरील रॉयल हब इमारतीमधील मनसे संपर्क कार्यालयात दुपारी 3 ला बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मालेगाव शहर व तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दरवर्षी गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. मात्र, कोरोनामुळे दोन वर्षांत हा मेळावा होऊ शकला नव्हता. त्यातच अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या मुंबई महापालिकेसह इतर महापालिकांच्या निवडणुका लक्षात घेता या गुढीपाडवा मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या मेळाव्यासाठी सध्या मनसेच्या विविध संघटनांच्या बैठका आयोजित करण्यात येत आहेत. या अनुषंगाने मालेगाव मनसे शहराध्यक्ष भामरे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेत मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन केले. यावेळी शहराध्यक्ष भामरे, अविनाश चव्हाण, प्रवीण सोनवणे, चेतेश आसेरी, हर्षल जाधव, डॉ. राईस सिद्दीकी, हाजी गुलशन, संदीप भोईटे कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button