आजचे राशिभविष्य (१ एप्रिल २०२२) | पुढारी

आजचे राशिभविष्य (१ एप्रिल २०२२)

मेष : अचानक खर्च निर्माण होतील. दवाखान्यासाठी खर्च होईल. दुसर्‍यावर विसंबून राहू नका. कामाला लागा. गैरसमजातून वादविवाद होण्याची शक्यता.

वृषभ : रखडलेली कामे मार्गी लागतील. उसने दिलेले पैसे परत येतील. नवीन कामांना सुरुवात कराल. आवडत्या लोकांची साथ लाभेल.

मिथुन : संकल्प सिद्ध होतील. जबाबदारी वाढेल. लोकांचा विश्वास संपादन कराल. मान-सन्मान मिळवून देणारी घटना घडेल. गृहसौख्य उत्तम राहील.

कर्क : सरकारी कामांना महत्त्व द्या. प्रतिष्ठा सांभाळावी लागेल. मनःस्वास्थ्य बिघडवणार्‍या घटना घडतील. आरोग्याच्या तक्रारी संभवतात.

सिंह : प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही अपयश येईल. आर्थिक ताणतणाव निर्माण होतील. मनःस्ताप होण्याची शक्यता. आरोग्याकडे दुर्लक्ष नको.

कन्या : आजपर्यंत केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना यश मिळेल, इष्ट ते साध्य झाल्यामुळे प्रसन्नता प्राप्त होईल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल.

तूळ : पथ्थ्ये पाळल्याने आरोग्य सुधारेल. कार्यक्षमता वाढेल. शत्रूंवर विजय प्राप्त कराल. वाद-विवादात जय प्राप्त कराल. सज्जनांचा सहवास लाभेल.

वृश्चिक : आपला उत्साह कमी होईल. मनःस्वास्थ्य बिघडेल. गुंतवणूक करण्यासाठी अयोग्य दिवस. नुकसान होण्याची शक्यता.

धनु : मनाविरुद्ध गोष्टी घडतील. मानसिक व शारीरिक आरोग्य सांभाळावे लागेल. कौटुंबिक वातावरण ताणतणावाचे राहील. भयभीत होण्याचे प्रसंग निर्माण होतील.

मकर : कलागुणांना वाव मिळेल. लेखक-कलाकारांना व्यावसायिक संधी उपलब्ध होतील. आर्थिक प्रगती होईल. उत्साहवर्धक वातावरण राहील.

कुंभ : गुंतवणुकीत नुकसान होण्याची शक्यता. वाणीवर नियंत्रण आवश्यक आहे. अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका. मनःस्ताप होण्याची शक्यता.

मीन : आप्तेष्टांना मदत कराल. आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल. प्रसन्नता लाभेल. आर्थिक प्रगती होईल. मनपसंद खरेदी होईल. इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील.

Back to top button