नाशिक : मला कॉल कर, नाहीतर…,अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन दिली धमकी | पुढारी

नाशिक : मला कॉल कर, नाहीतर...,अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन दिली धमकी

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
एका अल्पवयीन शाळकरी मुलीचा पाठलाग करून व त्यानंतर तिला एकांतात गाठून मला कॉल कर, नाहीतर तुझ्या आई-वडिलांना मारहाण करेन, अशी धमकी देणार्‍या युवकाविरुद्ध नाशिकरोड पोलिसांनी पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला. यासंदर्भात पीडित मुलीने तक्रार दिली.

नाशिकरोड परिसरात राहणारी शाळकरी मुलगी घरी जात असताना तिचा रेहान शेख नावाच्या युवकाने पाठलाग केला. त्यानंतर रस्त्यावर एकांतात गाठून तू मला फोन कर, नाही केला तर तुझ्या आई-वडिलांना मारहाण करेल, अशी धमकी दिली. त्यानंतर पीडित मुलीने ही बाब वडिलांना सांगितली व याचा जाब विचारला असता रेहान याला राग आला. त्याने पीडित मुलीच्या वडिलांना बेदम मारहाण केली. या प्रकारानंतर पीडितेने नाशिकरोड पोलिसांत तक्रार दाखल केली. शेखविरुद्ध पोस्को कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक गणेश न्हायदे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक वाघ करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button