महागाईविरोधात काँग्रेसचा ‘हल्‍लाबोल’, राहुल गांधींसह ज्‍येष्‍ठ नेते उतरले रस्‍त्‍यावर | पुढारी

महागाईविरोधात काँग्रेसचा 'हल्‍लाबोल', राहुल गांधींसह ज्‍येष्‍ठ नेते उतरले रस्‍त्‍यावर

पुढारी ऑनलाईन डेस्‍क: वाढत्‍या महागाईविरोधात काँग्रेस पक्षाच्‍या वतीने आज ( दि. ३१) देशव्‍यापी निदर्शने केली जात आहेत. दिल्‍लीत काँग्रेसचे माजी अध्‍यक्ष राहुल गांधींसह ज्‍येष्‍ठ नेते रस्‍त्‍यावर उतरले. त्‍यांनी जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा तीव्र निषेध केला.

मागील काही दिवस इंधन दरवाढीसह जीवनावश्‍यक वस्‍तुंचे दरात झालेल्‍या वाढीचा निषेध करण्‍यासाठी आज काँग्रेस पक्षाच्‍यावतीने आंदोलन करण्‍यात येत आहे. दिल्‍लीत झालेल्‍या आंदोलनावेळी काँग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते मल्‍लिकार्जुन खर्गे म्‍हणाले की, ” केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेल दरात अनावश्‍यक वाढ करत आहे. याचा परिणाम अन्‍य वस्‍तुंच्‍या दरवाढीवर झाला आहे. संयुक्‍त पुरोगाम आघाडी (युपीए) सरकारच्‍या काळात असणार्‍या इंधन दर  एवढे दर करावेत, अशी आमची मागणी आहे.”

महागाईविरोधात आमचे आंदोलन सुरु राहणार : राहुल गांधी

यावेळी काँग्रेसचे माजी अध्‍यक्ष राहुल गांधी म्‍हणाले की, “मागील १० दिवसांमध्‍ये केंद्र सरकारने ९ वेळा पेट्रोल आणि डिझेलच्‍या दरात वाढ केली आहे. यामुळे मध्‍यम वर्ग आणि गरीबांची होरपळ होत आहे. केंद्र सरकारने इंधनाचे दर स्‍थिर ठेवणे आवश्‍यक आहे. महागाईविरोधात संपूर्ण देशात आमचे आंदोलन पुढील काही दिवस सुरु राहणार असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले”.

पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे महागाईचा भडका : शशि थरुर

यावेळी काँग्रेस नेता शशि थरुर म्‍हणाले की, “पेट्रोल आणि डिझेल दरवाढीमुळे महागाईचा भडका उडाला आहे. संपूर्ण जगात कच्‍च्‍या तेलाच्‍या किंमती कमी होत्‍या तरीही केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलच्‍या दरात वाढ करत होती. प्रति लिटर १०१ रुपये पेट्रोलमधील ५२ रुपये हे केंद्र सरकार कर रुपात आकारत आहे. या दरवाढीमुळेच अन्‍य जीवनाश्‍यक वस्‍तूंच्‍या किंमतीही गगनाला भिडल्‍या आहेत.”

हेही वाचलं का? 

 

Back to top button