एसटी कर्मचार्‍यांना उपमुख्यमंत्र्यांचा इशारा, म्‍हणाले, "त्‍या एसटी कर्मचार्‍यांना.." | पुढारी

एसटी कर्मचार्‍यांना उपमुख्यमंत्र्यांचा इशारा, म्‍हणाले, "त्‍या एसटी कर्मचार्‍यांना.."

पुढारी ऑनलाईन डेस्क: एसटी कर्मचार्‍यांना कामावर रुजू हाेण्‍यासाठी ३१ मार्चपर्यंतची मूदत दिली आहे. आज त्‍यांनी कामाजवर हजर व्‍हावे. सरकारचा आदेशाचे पालन न करणार्‍या एसटी कर्मचार्‍यांना बडतर्फ केले जाईल. त्‍यांच्‍या जागी नवीन भरती केली जाईल, असा इशारा उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांनी आज दिला.

माध्‍यमाशी बाेलताना अजित पवार म्‍हणाले की, राज्‍य सरकारने संपात सहभागी झालेल्‍या एसटी कर्मचार्‍यांना ३१ मार्चपर्यंतची डेडलाईन दिली हाेती. त्‍यांनी या आदेशाची अंमलबजावणी करण्‍याचा अखेरचा दिवस आहे. तरी सर्व एसटी कर्मचार्‍यांना  कामावर रुजू व्‍हावे. मात्र या आदेशाचे उल्‍लंघन करणार्‍या कर्मचार्‍यांना एसटीतून बडतर्फ केले जाईल. त्‍या ठिकाणी नव्‍याने भरती केली जाईल.

विराेधी पक्षाच्‍या नेत्‍यांने प्रतिक्रिया दिली तर बाेललेच पाहिजे असे नाही. प्रत्‍येका आपलं मत व्‍यक्‍त करण्‍याचा अधिकार आहे. महाविकास आघाडी सरकारमध्‍ये तीन पक्ष आहेत. यामध्‍ये प्रत्‍येक पक्षाच्‍या लाेकप्रतिनिधींची मते वेगळे असू शकतात. आम्‍ही चर्चा करुनच निर्णय घेताे, असेही त्‍यांनी नमूद केले.

आमदारांना घरे देण्‍याचा निर्णयाबाबतच्‍या घाेषणा विधानसभेत करण्‍यात आली. ही घाेषणा करताना काही बाबी मंत्री आव्‍हाड यांनी स्‍पष्‍ट केल्‍या नाहीत. त्‍यामुळे माध्‍यमांमध्‍ये त्‍याबद्‍दल साशंकता घेण्‍यात आली. मुंबईत आमदारांना घरे फुकूट देण्‍यात येणार नव्‍हती. ज्‍या आमदरांचे स्‍वत:च्‍या व पत्‍नीच्‍य नावे  मुंबईत घर नाही, त्‍यांनाच सरकारी किंमतीनुसारच घर देण्‍याचे ठरले हाेते. मात्र याची घाेषणा करताना मंत्री आव्‍हाड यांनी आमदारांना मुंबईत घरे देणार असे सांगितले. त्‍यामुळे यावर टीका झाली. यासंदर्भात राष्‍ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची  भूमिका अंतिम आहे, असेही ते म्‍हणाले.

हेही वाचलं का?  

 

 

 

Back to top button