राज्यस्तरीय संस्कृत हौशी नाट्यस्पर्धेत नाशिकचा डंका ; मृगयाकलह: प्रथम | पुढारी

राज्यस्तरीय संस्कृत हौशी नाट्यस्पर्धेत नाशिकचा डंका ; मृगयाकलह: प्रथम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पुणे, मुंबई, नागपूर आणि नाशिक केंद्रांमध्ये पार पडलेल्या 60 व्या महाराष्ट्र राज्य हौशी संस्कृत नाट्यस्पर्धेत नाशिक केंद्रातून वैदिक ज्ञान विज्ञान संस्कृत महाविद्यालय, नाशिक या संस्थेच्या मृगयाकलहः या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केली आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या अंतिम फेरीचे पुणे/मुंबई/नागपूर नाशिक केंद्रांवरील अन्य निकालांमध्ये इंद्रधनू कलाविष्कार, मिरज, सांगली या संस्थेच्या अरुन्धानः या नाटकास द्वितीय पारितोषिक आणि महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड, मुंबई या संस्थेच्या देवादपिगरीयसी या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. दिग्दर्शनात प्रथम पारितोषिक तन्मय भोळे (मृगयाकलहः), द्वितीय बद्रिश कट्टी (अरुन्धानः), नाट्यलेखनात प्रथम पारितोषिक पं. प्रभाकर भातखंडे (देवादपिगरीयसी), द्वितीय वर्षा कुलकर्णी (कालसर्पिणि), प्रकाशयोजनेत प्रथम पारितोषिक शशांक लिमये (कालसर्पिणि), द्वितीय कृष्णा वाळवे (नाटक – कर्णभारम्), नेपथ्यामध्ये प्रथम पारितोषिक नंदकिशोर लिमये (अरुन्धानः), द्वितीय चैतन्य गायधनी (मृगयाकलह:), रंगभूषेत प्रथम माणिक कानडे (मृगयाकलहः), द्वितीय रंगनाथ अडागळे (कर्णभारम्), उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक विजेत्यांमध्ये तन्मय भोळे (मृगयाकलहः), बद्रिश कट्टी (अरुन्धानः), नेहा नाईक ( अरुन्धानः), नक्षत्रा बोडस ( नृत्यकूटम्) तसेच अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रात सृष्टी करंदीकर (कालसर्पिणि), रिद्धी कुलकर्णी (गुम्फनम्), श्वेता पत्की (कस्यांश्चित् निशायाम्), अंकिता मुसळे (अभिविक्रमम्), हेरंब कुलकर्णी (मृगयाकलहः), दिलीप धोत्रे (गुम्फनम्), ऋग्वेद देशपांडे ( प्रतिज्ञायौगंधराणम्), आचार्य अमेय (प्रतिज्ञायौगंधराणम्) यांचा समावेश आहे.

दरम्यान, दि. 16 मार्च ते 25 मार्च 2022 भरतनाट्य संशोधन मंदिर-पुणे, साहित्य संघ मंदिर, मुंबई, सायंटिफिक सभागृह, नागपूर आणि साईखेडकर नाट्यगृह, नाशिक येथे झालेल्या या स्पर्धेत एकूण 20 नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून माधव आजेगांवकर, डॉ. जयश्री साठे आणि डॉ. मंजूषा कुलकर्णी यांनी काम पाहिले. सर्व पारितोषिक विजेत्यांचे सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चौरे यांनी प्रसिद्धिप्रत्रकातून अभिनंदन केले आहे.

हेही वाचा :

Back to top button