जळगाव : बनावट पॉकीट व बेल्ट विक्री करणाऱ्यांवर पोलिसांचा छापा ; 8 लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगाव : बनावट पॉकीट व बेल्ट विक्री करणाऱ्यांवर पोलिसांचा छापा ; 8 लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगाव पुढारी वृत्तसेवा : लीवाईस कंपनीचे बनावट व हुबेहुब लेबल लावून कंपनीची फसवणूक करणाऱ्या दोन जणांवर शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी सुमारे ८ लाख ९४ हजार २०० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून दोन जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील बळीराम पेठ आणि गोलाणी मार्केट परिसरात लीवाईस कंपनीच्या नावाने बनावट बेल्ट व पॉकीट विक्री होत असल्याची माहिती लीवाईस कंपनीचे फिल्ड ऑफीसर सिध्देश सुभाष शिर्के (वय-३०) रा. शामनगर जोगेश्वरी पुर्व मुंबई यांना मिळाली. त्यानुसार सिध्देश शिर्के आणि सहकारी सचिन रमेश गोसावी यांनी शहर पोलीस ठाण्यात जावून माहिती दिली.

त्यानुसार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांनी सहाय्यक पोलीस संदीप परदेशी, डीबी पथकातील पोहेकॉ उमेश भांडारकार, पोहेकॉ. विजय निकुंभ, रतहरी गीते, प्रणेश ठाकूर यांचे पथक तयार करून कारवाईच्या सुचना दिल्या. त्यानुसार पथकाने बुधवारी (दि. २३) रोजी सायंकाळी शहरातील बळीरामपेठ येथील कलाशंकर अपार्टमेंटमधील विशाल प्लॉस्टीकच्या समोर पाटे जनरल स्टोअर्स आणि गोलाणी मार्केटमधील हनुमान मंदिराजवळ छापा टाकला.

लीवाईस कंपनीच्या नावाने बनावट व हुबेहुब असलेले विविध रंगाचे पाकीट आणि विविध रंगाचे बेल्डचा मोठा साठा आढळून आला. यात सुमारे ८ लाख ९४ हजार २०० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी सिध्देश सुभाष शिर्के (वय-३०) रा. शामनगर जोगेश्वरी पुर्व मुंबई यांच्या फिर्यादीवरून किशोर रामचंद पाटे (वय-५६) रा. बळीराम पेठ आणि धिरज रमेश बागवाणी (वय-४५) रा. गायत्री नगर, जळगाव यांच्या विरोधात कॉपीराईट ॲक्ट कायद्यान्वये शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉस्टेबल रविंद्र सोनार करीत आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news