‘विकिलीक्‍स’चे ज्युलियन असांजे यांचा तुरुंगातच विवाह संपन्न; भेट स्वरुपात केली पैशांची मागणी

‘विकिलीक्‍स’चे ज्युलियन असांजे यांचा तुरुंगातच विवाह संपन्न; भेट स्वरुपात केली पैशांची मागणी

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'विकिलीक्स'चे संस्थापक ज्युलियन असांजे यांनी दक्षिण-पूर्व लंडनमधील तुरुंगात बुधवारी (दि.२३ ) प्रेयसी स्टेला मॉरिस यांच्‍याशी विवाहबद्‍ध झाले. विवाहाच्या पेहरावात ३८ वर्षीय माॅरिस या गॅब्रियल, मॅक्स या मुलांसह आणि असांजेचे वडील रिचर्ड यांच्यासोबत तुरुंगात पोहोचल्‍या. येथे स्‍टेला आणि ज्‍युलियन यांचा विवाह संपन्‍न झाला, असे लंडनमधील बेलमर्श तुरुंगातील अधिकार्‍यांनी सांगितले.

स्टेला मॉरिस हिने विवाहापूर्वी  स्थानिक वृत्तपत्र गार्डियनमध्ये लिहिले होते की, "आज माझ्या विवाह आहे. मी माझ्या आयुष्यातील प्रेम करणाऱ्याशीच विवाह करणार आहे. ते माझ्या दोन मुलांचा पिता, एक बुद्धीमान आणि चेष्टेखोर व्यक्ती आहेत. त्यांना चूक आणि बरोबर काय, याची समज आहे. ते एक धाडसी प्रकाशकाच्या रुपात जगभर ओळखले जातात."

स्टेला मॉरिसने आपल्या विवाह सोहळ्यात शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान केले होते. त्या शुभ्र वस्त्राची रचना लोकप्रिय वस्त्र रचनाकार विवीनी वेस्टनुड यांनी केली. नवदाम्पत्याने विवाहाचे समर्थन करणाऱ्या प्रत्येक चाहत्यास भेटवस्तू देण्याऐवजी पैशांच्या रुपात दान देण्याचे आवाहन केले आहे. असांजे याला कारागृहातून साेडविण्‍यासाठी  या पैशांचा वापर करण्‍यात येणार आहे.

ऑस्ट्रेलियामधील संपादक, प्रकाशक आणि चळवळकर्ते असांजे  लंडन बेलमर्श तुरुंगात २०१९ कैद आहेत.असांजे हे मॉरिसपेक्षा १२ वर्षांनी माेठे आहेत. २०११ मध्‍ये या दाेघांची पहिल्‍यांदा भेट झाली हाेती. मॉरिस या असांजे यांच्‍या कायदेशीर सल्लागारांच्या समूहात काम करत हाेत्‍या. २०१५ मध्ये दाेघांमधील विशेष नात्याला सुरूवात झाली हाेती. माॅरिस आणि असांजे यांना चार वर्षीय गॅब्रियल व दाेन  वर्षीय मॅक्स अशी दाेन मुलेही आहेत.

ज्यूलियन असांजे आणि स्टेला मॉरिस यांनी आपल्या साखरपुड्याची घोषणा नोव्हेंबर २०२१ मध्‍ये केली होती. असांजे यांना लंडनच्या बेलमर्श तुरुंगात विवाह करण्याची परवानगी  दिली होती.  जगभरातील विविध सरकारच्‍या कारभाराची गुप्त दस्ताऐवज उघड केल्‍याच्या आरोपाखाली असांजे याला अमेरिकेमध्ये प्रत्यार्पण करण्यात आले होते. ते या निर्णयाविरोधात कायदेशीर लढाई लढत आहेत.

हेही वाचलं का?  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news