नाशिक : हुक्का पार्टी प्रकरणातील संशयितांना कोठडी | पुढारी

नाशिक : हुक्का पार्टी प्रकरणातील संशयितांना कोठडी

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा
रविवारी (दि. 13) मध्यरात्रीच्या सुमारास माउंटन शॅडो रिसॉर्टमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्टीवर छापा टाकत 52 तरुण व 18 तरुणींसह 2 महिलांना ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे पथकाने अटक केली होती. संशयितांना इगतपुरी पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता, दोन महिलांना पोलिस कोठडी, तर उर्वरित संशयितांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.

पोलिसांच्या माहितीनुसार, रेवती कंपनीच्या हार्डवेअर स्पेअरपार्ट कंपनीतील देशातील प्रत्येक राज्यातील होलसेल डिस्ट्रिब्युटर असलेल्या संशयितांविरोधात इगतपुरी पोलिस ठाण्यात अनैतिक व्यापार कायदा व सिगारेट तंबाखू मुंबई प्रोव्हिजन अ‍ॅक्ट या कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व संशयितांना इगतपुरी पोलिसांनी सोमवारी दुपारी इगतपुरी न्यायालयात हजर केले. यावेळी सरकारी वकील व संशयितांच्या वकील यांच्यात युक्तिवाद झाला.

यावेळी पोलिसांनी संशयितांच्या कोठडीची मागणी केली असता, बचाव पक्षातर्फे त्यास विरोध करण्यात आला. यानंतर न्यायालयाने संशयित 52 तरुण, 18 तरुणींना न्यायालयीन कोठडी सुनावली, तर दोन महिलांना बुधवार (दि.16)पर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती सरकारी वकील अ‍ॅड. अर्चना महाले यांनी दिली.

हेही वाचा :

Back to top button