बेळगाव: भवानीनगर येथे एकाचा डोळ्यात चटणी टाकून खून | पुढारी

बेळगाव: भवानीनगर येथे एकाचा डोळ्यात चटणी टाकून खून

बेळगाव पुढारी वृत्तसेवा : मंडोळी रोडवरील भवानीनगर जवळील संस्कृती फार्मजवळ एकाचा खून झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. राजू दोडबन्नावर (वय ४५, सध्या रा. संस्कृती फार्म मूळ रा. हलगा बस्तवाड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

राजू यांची पत्नी आजारी असून, तिला पाहण्यासाठी दररोज सकाळी ते हॉस्पिटलमध्‍ये जात. आज सकाळी नेहमीप्रमाणे ते हॉस्पिटलसाठी घरातून बाहेर निघताना कंपाऊंडच्या बाहेर आल्यानंतर अज्ञातांनी त्यांच्या डोळ्यात चटणी टाकून खून केला आहे.

सध्या तरी त्यांच्या फक्त पायाला जखम दिसते. त्यामुळे नेमका खून कसा केला? याचा वडगाव पोलिसांकडून शोध सुरू आहे. वडगावचे निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर व त्यांचे सहकारी तपास करत आहेत.

हेही वाचा

Back to top button