नाशिक : सिडकोमध्ये अकरावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या | पुढारी

नाशिक : सिडकोमध्ये अकरावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
सावतानगर येथे अकरावीच्या विद्यार्थिनीने पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपाली गंगाधर शेळके (16, रा. सावतानगर, गार्गी कॉलेजसमोर, नवीन नाशिक) या युवतीने राहत्या घरात (दि.14) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केली. याबाबत अंबड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस नाईक बनसोडे करीत आहेत. दीपालीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

हेही वाचा :

Back to top button