नाशिक : शहरात भाजपचा जल्लोष; महिला पदाधिकाऱ्यांची कार्यालयासमोर फुगडी | पुढारी

नाशिक : शहरात भाजपचा जल्लोष; महिला पदाधिकाऱ्यांची कार्यालयासमोर फुगडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भाजपने उत्तर प्रदेशसह मणिपूर, उत्तराखंड आणि गोवा या चार राज्यांत विधानसभा निवडणुकांत विजय संपादन केल्याबद्दल नाशिक भाजपतर्फे वसंतस्मृती कार्यालयात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

कार्यालय परिसरात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विजयोत्सवाच्या घोषणा देत मिठाईवाटप केली. तर महिला कार्यकर्त्यांनी फुगड्या घालून आपला आनंद साजरा केला. चारही राज्यांतील निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून, येणार्‍या निवडणुकांत यश संपादन करण्याचा विश्वास यावेळी पदाधिकार्‍यांनी व्यक्त केला.

हेही वाचा :

Back to top button