धुळे : सराईत घरफोड्याला साथीदारासह बेड्या, पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

धुळे : सराईत घरफोड्याला साथीदारासह बेड्या, पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त
Published on
Updated on

धुळे पुढारी वृत्तसेवा ; धुळे तसेच नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला त्याच्या साथीदारासह चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहे. गुन्हेगारांकडून सुमारे पावणे दोन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सराईत गुन्हेगार असणारा इम्रान बारक्या याच्याविरोधात धुळे जिल्ह्यात 14 तर नाशिक जिल्ह्यात दोन गुन्हे दाखल आहे. आता अधिक चौकशीत आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता पोलिस पथकाने वर्तवली आहे.

धुळे शहरातील माणिक नगर भागात राहणारे महेंद्र बाबुराव कापडे यांच्याकडे घरफोडी झाली होती. या संदर्भात चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या माध्यमातून सुरू होता. या गुन्ह्याचा तपास करीत असताना घटनास्थळी असणाऱ्या सीसीटीव्ही फुटेज ची पाहणी करण्यात आली. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असलेल्या एका व्यक्तीची हालचाल आणि त्याच्या शरीरयष्टी वरून हा गुन्हेगार सराईत असल्याची बाब पोलिसांना निदर्शनास आली.

त्यानुसार या भागातून गोपनीय माहिती गोळा करण्यात आली. यात हा गुन्हा इमरान उर्फ इमरान बाचक्या शेख खालीद उर्फ कादिर मोहम्मद तसेच त्याचा सहकारी तौसिफ शहा उर्फ फैजल उर्फ सोहेल आरिफ शहा यांनी केल्याची बाब निदर्शनास आली. त्यानुसार पोलिस पथकाने या दोघांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी माणिक नगरात चोरी केल्याची माहिती दिली. या दोघांकडून एक लाख 84 हजार 600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दरम्यान यातील इमरान हा सराईत गुन्हेगार असून एकट्या धुळे शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत त्याने पाच गुन्हे केले असून आझादनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीन, देवपूर पोलिस ठाण्यांच्या हद्दीमध्ये एक, पश्‍चिम देवपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीन तर चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक, धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक आणि मालेगाव येथील आयशानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दोन गुन्हे केल्याची बाब निदर्शनास आली आहे. यातील सर्व गुन्हे घरफोडीचे असून या दोघांच्या चौकशीत आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिस पथकाने व्यक्त केली आहे.

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज.. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. ? पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news