माणसांमुळे आकसतो आहे मांजरांचा मेंदू! | पुढारी

माणसांमुळे आकसतो आहे मांजरांचा मेंदू!

न्यूयॉर्क : गेल्या दहा हजार वर्षांच्या काळात पाळीव मांजरांच्या कवटीचा आकार लक्षणीयरीत्या लहान झालेला असल्याचे आढळून आले आहे. अर्थातच त्याबरोबर मांजरांचा मेंदूही आकसत चालला आहे. ही सर्व मानवांची चूक असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. हजारो वर्षे माणसावर अवलंबून राहिल्याने मांजरांचा मेंदू असा आकसला आहे.

‘रॉयल सोसायटी ओपन सायन्स’ या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. सध्याच्या पाळीव मांजरांची त्यांच्या निकटच्या दोन वन्य पूर्वजांशी तुलना करण्यात आली. यामध्ये आफ्रिकन (फेलीस लायबिका) आणि युरोपियन (फेलीस सिल्वेस्ट्रिस) वाईल्डकॅटचा समावेश होता. त्यामधून दिसून आले की वन्य मांजरांच्या तुलनेत पाळीव मांजरांच्या कवटीचा आणि मेंदूचा आकार कमी झाला आहे.

अर्थात याचा अर्थ असा नाही की आपली मनीमाऊ जंगली मांजरांच्या तुलनेत ‘ढ’ आहे! मात्र त्यांच्यामध्ये पाळीव प्राण्याचे गुण यामुळे येत असतात. आफ्रिकन आणि युरोपियन वाईल्डकॅटस्च्या तुलनेत पाळीव मांजरांच्या कवटी व मेंदूचा आकार 25 टक्क्यांनी घटला असल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा

Back to top button