त्र्यंबकला आलेल्या भाविकांचे वाहन उलटले, 11 गंभीर ; 27 किरकोळ जखमी - पुढारी

त्र्यंबकला आलेल्या भाविकांचे वाहन उलटले, 11 गंभीर ; 27 किरकोळ जखमी

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा
त्र्यंबकेश्वर येथे पैठण (जि. औरंगाबाद) येथून आलेल्या भाविकाचा पिकअप परतीच्या प्रवासादरम्यान, त्र्यंबकपासून अवघ्या दोन कि.मी.अंतरावर उलटले. या अपघातात अकरा जण गंभीररित्या जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, यात लहान मुलींचा समावेश अधिक आहे. तसेच, 27 जणांना किरकोळ जखमा झाल्या असून, त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्र्यंबकमधील मठात ठेवण्यात आले आहे.

येथील यावर्षीची पौषवारी रद्द झाल्याने वारकरी वाहनाने दर्शनासाठी येत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील राधाकृष्ण आश्रमात वारकरी शिक्षण घेणा-या मुली आणि त्यांच्या समवेत पालक, शेजार्‍यांसह एका महिंद्रा पिकअप वाहनातून 38 वारकरी बुधवारी (दि.19) त्र्यंबकेश्वर येथे आले होते. येथील मुकुंद महाराज मठात ते वास्तव्यास होते. संत निवृत्तीनाथ महाराज समाधी दर्शन, ब—ह्मगिरी प्रदक्षिणा आदी सर्व आटोपले. त्यानंतर गावी परतण्यासाठी शुक्रवारी (दि.21) जानेवारीच्या पहाटे परतीच्या प्रवासाला निघाले असता, सकाळी 6 वाजेच्या दरम्यान त्र्यंबकेश्वरपासून अवघ्या दोन किमी अंतरावर असलेल्या वीज वितरण उपकेंद्राच्या उतारावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप पलटी झाली. या अपघातात 11 जण गंभीर तर 27 जणांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. गंभीर जखमींमध्ये मुलींची संख्या अधिक आहे.

अपघाताची माहिती मिळताच मुकुंद मठाचे लक्ष्मण महाराज यांनी तातडीने धाव घेतली. गौरव पवार, दीपक आहेर, मच्छिंद्र घुले, अक्षय नारळे, राजू जाधव, लक्ष्मण महाराज, संपत लांडे, भास्कर मुतडक, किरण चौधरी तसेच गजानन संस्थान स्टॅन्ड रिक्षाचालकांनी त्वरित धाव घेत जखमींना ञ्यंबक उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले.

गंभीर जखमी :
विजय बनसोड (65), वील बोंबले (62), चंद्रकला जानकर (65), सोनाली बोबडे (16), श्रूष्टी साकळे (16), वेदीका इथपा (15), सुदर्शन बनसोड (18), वैष्णवी वाघमोडे (12), ऋतुजा कासार (14), ममता जोशी (13), वैष्णवी बनसोड (13) या गंभीर जखमींवर नाशिक उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तर, कार्तिक बोंबले (12), प्रतिक्षा कासार (14), अंजली हरळे (16), दिपाली कोल्हे (16), गीता कोल्हे (15), पल्लवी आमलावे (15), भक्ती शिंदे (14), ऋतुजा गावंडे (16), कार्तिकी बोबडे, प्रतिक्षा बोबडे (10), अंकिता डांगे (13), वेदीका निकम (14), ज्ञानेश्वर थोरात (10), साक्षी थोरात (10), मनिषा कासार (18), गायत्री बनसोड (11), जयश्री मानमोडे (18), सुप्रिया झेटे (13), मानसी परळकर (15), परीजान गवळी (6), कृष्णा बनसोड (6), नंदा परळकर (70), लिलाबाई बनसोड (55), गंगाधर काकडे (65), भाऊसाहेब बोबडे (50), पुरुषोत्तम देशमुख (22) या सर्वांवर प्रथमोपचार करून त्र्यंबकेश्वर येथील मुकुंद महाराज मठ येथे ठेवले आहे. या प्रकरणी त्र्यंबक पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार मेघराज जाधव हे करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button