Priyanka Chopra-Nick Jonas : प्रियांका-निकनं दिली गुड न्यूज! सरोगसीद्वारे बनले आई-बाबा  - पुढारी

Priyanka Chopra-Nick Jonas : प्रियांका-निकनं दिली गुड न्यूज! सरोगसीद्वारे बनले आई-बाबा 

पुढारी ऑनलाईन डेस्क : Priyanka Chopra-Nick Jonas : बॉलिवूडची देसी गर्ल अशी ओळख असलेल्या आणि आपल्या अभिनयाने हॉलिवूडमध्ये मजल मारलेल्या प्रियांका चोप्राने आपल्या चाहत्यांना गूड न्यूज दिली आहे.

प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनासने (Nick Jonas) या दोघांनी आपल्या सोशल मीडिया अकांउटवरून गुड न्यूज आपल्या चाहत्यांशी शेअर केली आहे. सरोगसीच्या माध्यमातून प्रियांका चोप्रा आई झाली आहे. ही आनंदाची बातमी देत असताना तिने आपल्या पोस्टमध्ये आवर्जुन हे लिहिले आहे की, “प्रत्येकाने आपली गोपनियता राखायची आहे. आम्हाला आनंद होत आहे की, आम्ही आमच्या मुलाचे स्वागत हे सरोगसीद्वारे करत आहोत. चाहत्यांना आवाहन करतो की, सर्वांनी गोपनितया ठेवायची आहे. आम्हाला आमच्या कुटुंबावर लक्ष द्यायचे आहे.”

priyanka-chopra www.pudhari.news
desi girl Priyanka-chopra gave good news

(Priyanka Chopra-Nick Jonas) प्रियांका आणि निकची ही गुड न्यूज सोशल मीडियावर येताचं त्यांच्या चाहत्यांनी भरभरून शभेच्छा दिल्या आहेत आणि दोघांचे अभिनंदन केले आहे. याचबरोबर अनेक  बॉलिवूड-हॉलिवूड कलाकारांनीही कॉमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

१ डिसेंबर २०१८ रोजी आपल्यापेक्षा १० वर्षांनी लहान असलेल्या हॉलिवूड गायक निक जोनासशी प्रियांका विवाहबंधनात अडकली होती. यावेळी ती चर्चेत आली.  प्रियांका नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांनी नेहमी चर्चेत असते. मध्यंतरी तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या नावासमोरील पती जोनासचे नाव हटवल्याने  ती चांगलीच चर्चेत आली होती. 

प्रियांकाही फक्त एकटीच अभिनेत्री नाही जी सरोगसीच्या माध्यमातून आई झाली आहे. या अगोदरही अनेक बॉलिवूड अभिनेते-अभिनेत्री सरोगसीच्या माध्यमातून आई-बाबा (Bollywood surrogacy parents) झाले आहेत. यामध्ये प्रिती झिंटा, गौरी खान, किरण राव, फराह खान आदी सेलिब्रिटी सरोगसीच्या माध्यमातून आई-बाबा झाले आहेत.

हेही वाचलंत का? 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

Back to top button