ज्येष्ठ साहित्यिक, कवी पुष्पाग्रज उर्फ अशोक नाईक तुयेकर यांचे निधन - पुढारी

ज्येष्ठ साहित्यिक, कवी पुष्पाग्रज उर्फ अशोक नाईक तुयेकर यांचे निधन

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

गोव्यातील ज्येष्ठ साहित्यिक, कवी तथा पत्रकार पुष्पाग्रज उर्फ अशोक नाईक तुयेकर (वय ७०) यांचे अल्पशा अजाराने शुक्रवारी रात्री उशिरा ११.३० च्या सुमारास निधन झाले. सकाळी त्यांना ह्‍दयविकाराचा झटका आल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरु असताना त्यांचे रात्री उशिरा निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, स्नुषा व नातवंडे असा परिवार आहे.

सूर्यकोटी सम प्रभ: या त्यांच्या नाटकाला गोवा कला आकादमीचे प्रथम पारितोषिक मिळाले होते. तसेच कॅलिडोस्कोप व नन्नरुख या त्यांच्या कविता संग्रहांना गोवा साहित्य अकादमीचे पुरस्कार मिळाले होते. श्री हिंदू गावो असोसिएशन तर्फे त्यांना बा.भ. बोरकर पुरस्कार मिळाला होता. तसेच पत्रकारितेत त्यांना लोकमान्य टिळक, संगम व अन्य पुरस्कार मिळालेले आहेत.

मडगाव येथील मठग्रामस्थ स्मशान भूमीत आज (शनिवार) दुपारी १२ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

Back to top button