VIDEO: मुंबई लोकलमध्ये चुकून महिलांच्या डब्यात चढला तरुण; चालत्या ट्रेनमधून उडी मारण्याचा प्रयत्न, महिलांनी वाचवलं

Mumbai Local Ladies Compartment Viral Video: एका तरुणाने चुकून महिलांच्या डब्यात प्रवेश केला. आपली चूक लक्षात आल्यानंतर त्याने चालत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न केल्याचं व्हिडिओमध्ये दिसतं आहे.
Mumbai Local Ladies Compartment Viral Video
Mumbai Local Ladies Compartment Viral VideoPudhari
Published on
Updated on

Mumbai Local Ladies Compartment Viral Video: मुंबई लोकलमध्ये प्रवास करताना घाईगडबडीत डबा चुकण्याच्या घटना घडत असतात. मात्र, एका तरुणाची चूक त्याच्या जीवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली होती. महिलांच्या डब्यात चुकून चढलेल्या या तरुणाला आपली चूक लक्षात आल्यानंतर त्याने चालत्या लोकलमधून उतरण्याचा प्रयत्न केला.

मात्र, प्रसंगावधान राखत डब्यातील महिलांनी त्याला पकडून मागे खेचलं आणि संभाव्य दुर्घटना टळली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

चुकून महिलांच्या डब्यात चढला तरुण

व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुण मुंबई लोकलच्या महिलांच्या डब्यात उभा असल्याचं दिसत आहे. काही वेळाने त्याला आपण चुकीच्या डब्यात चढल्याचं लक्षात येतं. महिलांनीही त्याला याबाबत सांगितल्यानंतर तो घाबरल्याचं व्हिडिओत दिसतं.

Mumbai Local Ladies Compartment Viral Video
Supreme Court: कार-बाईक मालकांसाठी महत्त्वाची बातमी; E20 Petrol वर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी, कोणत्या गोष्टी बदलणार?

आपली चूक लक्षात आल्यानंतर तरुणाने ट्रेन थांबण्याची वाट न पाहता चालत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रयत्न अत्यंत धोकादायक असल्याचं लक्षात येताच डब्यातील महिलांनी त्याला अडवलं.

महिलांनी चालत्या ट्रेनमधून उडी मारण्यापासून रोखलं

तरुण दरवाजाजवळ जाण्याचा प्रयत्न करत असताना काही महिलांनी त्याला पकडून आत खेचलं. चालत्या ट्रेनमधून उडी मारल्यास गंभीर दुखापत होऊ शकते किंवा जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे महिलांनी त्याला बाहेर पडू दिलं नाही.

Mumbai Local Ladies Compartment Viral Video
BMC Free School Uniform: ऑगस्ट संपला; विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, वह्या मिळेना! पालिकेचा ५२ कोटींचा निधी मंजूर

यानंतर तरुण महिलांसमोर हात जोडून माफी मागताना दिसतो. तो वारंवार आपली चूक झाल्याचं सांगत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. अखेर लोकल पुढच्या स्थानकावर पोहोचल्यानंतर त्याने ट्रेनमधून उतरण्याचा निर्णय घेतला.

VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. काही नेटकऱ्यांनी घाईगडबडीत प्रवास करताना डबा चुकण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे. मात्र, चालत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करणे अत्यंत धोकादायक असल्याने महिलांनी दाखवलेली प्रसंगावधानता महत्त्वाची ठरली, असंही अनेकांनी नमूद केलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news