Ganpati Special Trains: गणेशभक्तांसाठी रेल्वेचा ‘स्पेशल’ प्लॅन; मुंबई-मडगावदरम्यान ४ अतिरिक्त फेऱ्या

Konkan Railway News: सामान्य शुल्कासह अनारक्षित डब्यांचे बुकिंग यूटीएस प्रणालीद्वारे करता येईल
Ganpati Special Trains: गणेशभक्तांसाठी रेल्वेचा ‘स्पेशल’ प्लॅन; मुंबई-मडगावदरम्यान ४ अतिरिक्त फेऱ्या
Published on
Updated on

रोहे : कोकणात गणपती उत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांना मध्य रेल्वेकडून मुंबई आणि मडगांव दरम्यान ४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मडगांव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष गाडी (४ सेवा) गाडी क्रमांक 01007 विशेष गाडी ११.०९.२०२६ आणि १३.०९.२०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.४० वाजता सुटेल आणि मडगांव येथे त्याच दिवशी १५.३० वाजता पोहोचेल. (२ सेवा) गाडी क्रमांक 01008 विशेष गाडी ११.०९.२०२६ आणि दिनांक १३.०९.२०२६ रोजी मडगांव येथून १६.३० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०८.१५ वाजता पोहोचेल. (२ सेवा)

Ganpati Special Trains: गणेशभक्तांसाठी रेल्वेचा ‘स्पेशल’ प्लॅन; मुंबई-मडगावदरम्यान ४ अतिरिक्त फेऱ्या
Ganpati Special Trains 2026: गणपतीसाठी मडगाव व कुर्ला येथून विशेष गाड्या

या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि आणि करमळी हे थांबे देण्यात आले आहेत. गाडी क्रमांक 01007 गणपती आरक्षित विशेष गाडीसाठी आरक्षण सर्व पीआरएस केंद्रांवर आणि आयआरसीटीसी च्या संकेतस्थळावर (www.irctc.co.in) २९.०८.२०२६ रोजी सुरू होईल.

Ganpati Special Trains: गणेशभक्तांसाठी रेल्वेचा ‘स्पेशल’ प्लॅन; मुंबई-मडगावदरम्यान ४ अतिरिक्त फेऱ्या
Ganpati Special Trains: गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेच्या २४६ गणपती विशेष गाड्या

सामान्य शुल्कासह अनारक्षित डब्यांचे बुकिंग यूटीएस प्रणालीद्वारे करता येईल. तिकीट बुकिंगसाठी प्रवासी रेलवन ॲप देखील डाउनलोड करू शकतात. या विशेष गाड्यांच्या थांब्यांवरील सविस्तर वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीइएसॲप डाउनलोड करा असे मध्य रेल्वे कडून आवाहन करण्यात आले आहे.

logo
Pudhari News
pudhari.news