Mumbai Video: मुंबई लोकलमध्ये जीवघेणा प्रवास; गर्दीमुळे महिलांना बाहेर लटकून करावा लागतोय प्रवास; धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Mumbai Local Train Viral Video: मुंबई लोकलमधील प्रचंड गर्दीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, काही महिला ट्रेनच्या बाहेर लटकून प्रवास करताना दिसत आहेत.
Mumbai Local Train Viral Video
Mumbai Local Train Viral VideoPudhari
Published on
Updated on

Mumbai Local Train Viral Video: मुंबईची लाइफलाइन म्हणून ओळखली जाणारी लोकल ट्रेन पुन्हा एकदा प्रचंड गर्दीमुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत असून, त्यामध्ये एक महिला गर्दीने भरलेल्या लोकल ट्रेनच्या बाहेर लटकून प्रवास करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्यांच्या धाडसाचे कौतुक केले, तर काहींनी प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे.

हा व्हिडीओ X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओसोबत ‘नारी शक्ती को नमन’ असे कॅप्शन देण्यात आले आहे. मात्र, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या आहेत.

काही जणांनी महिलांच्या कामाप्रती असलेल्या जिद्दीचे आणि धाडसाचे कौतुक केले. रोजच्या प्रवासासाठी एवढी मोठी जोखीम पत्करून या महिला लोकलने प्रवास करत असल्याचे पाहून अनेकांनी त्यांना सलाम केला.

Mumbai Local Train Viral Video
ISRO Rocket Launch Cost |जगातील सर्वात महागडी रॉकेट लाँचिंग भारताची: 'कॅम्ब्रिज'चा दावा; इस्रोने दिले सडेतोड उत्तर

पण दुसरीकडे अनेकांनी या प्रकाराला धाडस किंवा ‘मुंबई स्पिरिट’ म्हणण्यास विरोध केला. प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असेल, तर ही व्यवस्था सुधारण्याची गरज असल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

एका युजरने म्हटले की, अशा प्रकारच्या प्रवासाचे कौतुक करण्याऐवजी मुंबईतील रेल्वे आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याची गरज आहे. गर्दीच्या वेळी प्रवाशांना सुरक्षित प्रवासासाठी पुरेशा सुविधा उपलब्ध व्हायला हव्यात.

Mumbai Local Train Viral Video
Monsoon Accident | छत्तीसगडमध्ये नदीत वाहून तीन मुलांचा मृत्यू

तर आणखी एका नेटकऱ्याने अतिशय महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. “ट्रेन पुन्हा मिळेल, पण आयुष्य पुन्हा मिळणार नाही,” असे म्हणत त्याने लोकलमध्ये जीव धोक्यात घालून चढू नये, असे आवाहन केले.

मुंबईतील लाखो नागरिकांसाठी लोकल ट्रेन हा दैनंदिन जीवनाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. काम, शिक्षण आणि इतर कारणांसाठी दररोज हजारो प्रवासी लोकलने प्रवास करतात. मात्र, गर्दीच्या वेळेत लोकलमध्ये होणारी प्रचंड कोंडी आणि त्यातून निर्माण होणारे धोके हा प्रश्न पुन्हा एकदा या व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news