ठाकरे सरकार अहंकाराच्या परमोच्च कोटीला गेलंय : आशिष शेलार

ठाकरे सरकार अहंकाराच्या परमोच्च कोटीला गेलंय : आशिष शेलार

मुंबई : पुढारी ऑनलाईन

भाजपच्या १२ आमदारांना मोठा दिलासा मिळाला आगहे. सर्वोच्च नायालयाकडून या १२ आमदारांचं निलंबन रद्द करण्यात आलंय. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा ठाकरे सरकारला मोठा झटका बसला आहे. यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया देत ठाकरे सरकारवर ताशेरे ओढले. ठाकरे सरकार अहंकाराच्या परमोच्च कोटीला गेलंय, अशी टीका आशिष शेलार यांनी केली.

बारा आमदारांच्या निलंबनाचा विधानसभा अध्यक्षांचा निर्णय रद्द करण्यात आलाय. अधिवेशनातील निलंबन अधिवेशनापुरता मर्यादित असावं.

एक वर्ष इतकं प्रदीर्घ कालावधीसाठी आमदारांचं निलंबनाचा अधिकार सदनाला नाही. त्यामुळे भाजप आमदारांचं निलंबन घटनाबाह्य आणि बेकायदेशीर असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

यावर भाजप नेते आशिष शेलार म्हणाले-देशातील लोकशाही बळकट करणारा निकाल आहे. हा ऐतिहासिक निर्णय भविष्यातील घटनांसाठी दिशादर्शक ठरणार आहे. ठाकरे सरकार अहंकाराच्या परमोच्च कोटीला गेलय. यावेळी शेलार यांनी शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्यावर टीका केली.

भास्कर जाधवांनी संविधानाचा अभ्यास करावा. संविधानाचा अर्थ लावण्याची जागा विधिमंडळ नाही. संविधानाचा अभ्यास न करता टिप्पणी करणे योग्य नव्हे. सर्वोच्च नायायालयाकडून ठाकरे सरकारची कानउघडणी करण्यात आलीय. महाविकास आघाडीच्या नेत्यांना तोडं दाखवायला जागा नाही, असेही शेलार यांनी नमूद केले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भास्कर जाधवांनी प्रतिक्रिया दिली. विधानसभेत कुणाला प्रवेश द्यायचा याचा अध्यक्षांनाचं अधिकार आहे, असे जाधव म्हणाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news