लता मंगेशकरांच्या तब्येतीत सुधारणा

लता मंगेशकरांच्या तब्येतीत सुधारणा

Published on

मुंबई :

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या तब्येतीत गुरुवारी आणखी सुधारणा झाली. सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली ब्रीच कॅन्डी रुग्णालयातील अतिदक्षता विभागातच त्यांच्यावर उपचार सुरू राहणार आहेत, असे लता मंगेशकर यांच्या ट्विटर अकाऊंटवरून सांगण्यात आले. डॉ. प्रतित समदानी यांच्या मार्गदर्शनाखाली लतादीदींवर 20 दिवसांपासून उपचार सुरू आहेत. लतादीदींच्या तब्येतीत सुधारणा व्हावी, यासाठी प्रार्थना करणार्‍या आणि त्यांना शुभेच्छा देणार्‍या प्रत्येकाचे आभारही ट्विटरच्या संदेशात लतादीदींनी व त्यांच्या कुटुंबीयांनी मानले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news