Expensive Wines : जगातील सर्वांत महागड्या वाईन्स; एकाची किंमत तर तब्बल ४ कोटी... | पुढारी

Expensive Wines : जगातील सर्वांत महागड्या वाईन्स; एकाची किंमत तर तब्बल ४ कोटी...

पुढारी ऑनलाईन डेस्क : आता माॅल, सुपर मार्केट आणि किराणा मालाच्या दुकानातही ‘वाईन’ मिळणार, राज्य सरकारचा निर्णय, अशी एक बातमी सर्व वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर झळकली आणि विविध स्थरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटायला लागल्या आहेत. तर, राज्य सरकारच्या वाईन्ससंदर्भातील निर्णयानिमित्ताने आपण जगातील सर्वात महागड्या वाईन्स (Expensive Wines) कोणत्या, त्याच्या किमती किती, यासंबंधी सविस्तर माहिती पाहुया…

रुमानी काॅन्टी ग्रॅण्ड क्रू (४ कोटी)

दरवर्षी फक्त ४५० बाटल्यांची निर्मिती केली जाते. प्रसिद्ध वाईन समिक्षक क्लाईव्ह कोट्स सांगतात की, “ही वाईन खानदानी असून अमृत आहे. वाईन्सविश्वात एक मापदंड आहे.” या वाईनची किंमत ९ लाख ५५ हजार ९२३ रुपयांपासून तब्बल ४ कोटी ८१ हजार ९९७ रुपये आहे. १९६० च्या बाटलीची किंमत बाजारात ४ लाख ६२ हजार ५७७ रुपये इतकी आहे.

Wines

हेन्री जयर रिचबर्ग ग्रॅण्ड क्रू (१ कोटी ७ लाख)

हेन्री जयरच्या बरगंडीमधील वाईन्सच्या यादीतील सर्वात शेवटची आणि सर्वात महागडी वाईन आहे. बरगंडी वाईन्सचे मालक बिझे लेराॅय सांगतात की, “रिचबर्ग वाईन ही रुमानी ली या वाईनपेक्षाही उत्कृष्ट आहे.” रिचबर्ग ग्रॅण्ड क्रूची किंमत १ कोटी २२ लाख ५ हजार १०९ रुपयांपासून १ कोटी ९ लाख ८४ हजार ४१४ रुपयांपर्यंत आहे. सध्या बाजारात १९७८ बाटलीची किंमत १ कोटी १३ लाख ७ हजार ६८२ रुपये इतकी आहे.

एगॉन म्युलर ट्रोकेनबीरेनाउसले  (१ कोटी ५३ हजार)

महागड्या वाईन्समध्ये पहिल्या १० च्या यादीत ही वाईन ३ क्रमांकावर येते. ही वाईन १७९७ सालापासून तयार केली जाते. एगॉन म्युलर  ट्रोकेनबीरेनाउसलेच्या केवळ १०० ते २०० बाटल्यांची निर्मिती केली जाते. द्राक्षांपासून ही वाईन्स तयार होते. या वाईनची किंमत ४ लाख ८६ हजार १४१ रुपयांपासून १ कोटी ५३ हजार ७०६ रुपयांपर्यंत आहे. (Expensive Wines)

Wines

वोस्ने-रोमानी प्रीमियर क्रू (१ कोटी)

हेन्री जयरचा दुसरा ब्रॅण्ड म्हणून ‘हेन्री जेयर क्रॉस पॅरांटॉक्स, वोस्ने-रोमानी प्रीमियर क्रू’ प्रसिद्ध असून ही वाईन्स द्राक्षांपासून तयार केली जात आहे. त्याची ७ लाख ७८ हजार ४८६ रुपयांपासून १ कोटी ४६ लाख ४ हजार ५०३ रुपयांपर्यंत आहे. १९८५ च्या बाटलीची किंमत ५ लाख ४३ हजार ४०० इतकी आहे.

डोमेन लेफ्लेव्ह मॉन्ट्राचेट ग्रँड क्रू (८ लाख)

बरगंडी डोमेन ही एक उत्कृष्ट वाईन म्हणून उच्चभ्रू वर्गात प्रसिद्ध आहे. ‘डोमेन लेफ्लेव्ह मॉन्ट्राचेट ग्रँड क्रू’च्या एका बाटलीची बाजारातील कमीत कमी किंमत ४ लाख ३३ हजार ९ रुपये, तर जास्तीत जास्त ८ लाख ६१ हजार २१६ रुपये इतकी आहे. सध्या बाजार १९९६ चा ब्रॅण्ड उपलब्ध असून त्याची किंमत ३ लाख ७० हजार ९६ रुपये इतकी आहे.

Wines

हेन्री जयर व्हाॅस्न-रुमानी (सर्वांत स्वस्त : ७ लाख)

जगातील सर्वात महागड्या वाईन्स बनविण्यामध्ये ‘हेन्री जयर’ हे नाव अव्वल स्थानी आहे. कारण, हेन्री जयर यांनी बरगंडीमध्ये वाईन्समध्ये विविधता आणण्याचा प्रयत्न खूप चांगला केला आहे. तर आपल्या लिस्टमध्ये ‘हेन्री जयर व्हाॅस्ने-रुमानी’, ही वाईन १० व्या क्रमांकावर येते. एका बाटलीची कमीत कमी किंमत ३ लाख ६ लाख ८५९ रुपये तर, जास्तीत जास्त किंमत ७ लाख २१ हजार २५७ रुपये इतकी आहे. व्हिन्टेज वाईनच्या यादीत येते. सध्या ‘हेन्री जयर व्हाॅस्ने-रुमानी १९८९’च्या बाटलीची किंमत ६ लाख ६५ हजार ३५४ रुपये इतकी किंमत आहे.

हे वाचलंत का? 

Back to top button