कोल्हापूर जिल्ह्यातील ९४० शाळा पुन्हा भरल्या, कोरोनाचे कडक पालन | पुढारी

कोल्हापूर जिल्ह्यातील ९४० शाळा पुन्हा भरल्या, कोरोनाचे कडक पालन

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्ह्यातील ९४० शाळांची घंटा वाजली. कोरोनामुक्त गावातील शाळा सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 940 माध्यमिक शाळा सुरू झाल्या आहेत. पहिल्या दिवशी सुमारे 1 लाख 55 हजार विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावल्याने परिसर पुन्हा गजबजून गेला आहे.

कोरोनामुक्त शहर व गावातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय नुकताच निर्णय घेतला. कोरोना नियमांचे तंतोतंत पालन करणे प्रत्येक शाळांना बंधनकारक आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

जिल्ह्यात माध्यमिकच्या सुमारे 1054 स्कूल असून त्यामध्ये सुमारे 2 लाख 83 हजार 243 विद्यार्थी संख्या आहे.

ग्रामीण भागातील माध्यमिक स्कूल गुरुवारपासून सुरू झाल्या आहेत. यापूर्वी शाळा सॅनिटाईज व स्वच्छता करून घेतली आहे.

पालकांचे संमतीपत्र घेऊनच शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिला आहे. यावेळी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.

एका बेंचवर एक विद्यार्थी बसत आहे. अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष भेट देऊन या शाळांची पाहणी केली.

आजारी विद्यार्थी, शिक्षकाची माहिती तत्काळ शिक्षण विभागास देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळावे, यासाठी जिल्ह्यातील आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत.

मोबाईलचा स्क्रीन पाहून-पाहून ते कंटाळले आहेत. शाळा सुरू होत असल्याने विद्यार्थी, पालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने शहरातील बहुतांश माध्यमिक शाळा बंद होत्या.

मात्र, 15 जूनपासून शैक्षणिक सत्र सुरू होण्याअगोदरपासून दहावी, बारावीचे ऑनलाईन वर्ग सुरू झाले आहेत.

आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यास सुरुवात केल्याचे शाळांच्या मुख्याध्यापकांनी सांगितले.

Back to top button