Mushtaq Antulay : मुश्ताक अंतुले राष्ट्रवादीत जाणार | पुढारी

Mushtaq Antulay : मुश्ताक अंतुले राष्ट्रवादीत जाणार

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अ. र. अंतुले यांचे जावई माजी आमदार मुश्ताक अंतुले काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 23 एप्रिल रोजी ते प्रवेश करणार आहेत.

काँग्रेसचे निष्ठावान नेते म्हणून मुश्ताक यांची ओळख असल्याने ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत हा काँग्रेसला धक्का मानला जातो. मुश्ताक अंतुले हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे जवळचे मित्र समजले जातात. अनेक कार्यक्रमांनिमित्त या दोन्ही नेत्यांचे एकमेकांकडे येणे-जाणे असते. आता ऐन निवडणुकीच्या धामधुमीत ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्यामुळे अलिबाग लोकसभा मतदार संघात निश्चितच तटकरे यांना फायदा होणार असल्याच्या चर्चा आहेत.

Back to top button