

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आज (दि.१) पत्रकार परिषदेत खेकडा दाखवत राज्यातील भ्रष्टाचाराचा मोठा गौप्यस्फोट केला. राज्यातील आरोग्य विभागात ६५०० कोटी रूपयांचा अॅम्ब्युलन्स घोटाळा झाल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. दिवसाला ३८ बालके मृत्यूमुखी पडत असताना आरोग्य विभाग मात्र पैसे खाण्यामध्ये मग्न आहे. आरोग्य विभागाने साडेसहा हजार कोटी रूपयांची दलाली केल्याचा आरोप करत त्यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यावर निशाणा साधला.
हेही वाचा :