

पुढारी ऑनलाईन डेस्क : वंचित बहुजन आघाडीने आज (दि. ३१) लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. एक्स पोस्ट करत ही माहिती दिली आहे. एकूण ११ उमेदवारांची ही यादी आहे. वंचितच्या पहिल्या यादीत एकूण ९ जागांचा समावेश होता. आज जाहीर केलेल्या यादीनंतर एकूण २० उमेदवार झाले आहेत.
वंचित बहुजन आघाडीकडून माढा मतदारसंघातून रमेश बारस्कर, सातारा लोकसभा मतदारसंघासाठी मारुती जानकर, तर धुळे मतदारसंघातून अब्दुल रहमान, हातकणंगले मतदारसंघातून दादासाहेब पाटील, रावेरमधून संजय पंडीत ब्राह्मणे, जालन्यातून प्रभाकर बाकळे, उत्तर मध्य मुंबईमधून अब्दुल खान आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गातून काका जोशी, लातूर मधून नरसिंहराव उदगीरकर आणि सोलापुरात राहुल गायकवाड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.