कृषी कायदे : पीएम मोदी, भाजपने शेतकऱ्यांची माफी मागावी : बाळासाहेब थोरात | पुढारी

कृषी कायदे : पीएम मोदी, भाजपने शेतकऱ्यांची माफी मागावी : बाळासाहेब थोरात

मुंबई; पुढारी ऑनलाईन

केंद्रीय तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा म्हणजे शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक लढ्याला यश आलं आहे. केंद्राने शेतकऱ्यांना फसवलं होतं. या कायद्यात व्यापाऱ्याला संरक्षण होतं. पण शेतकरी अडचणीत होता. हा ऐतिहासिक लढा आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद दिली. तीन कृषी कायदे रद्द केल्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

कोकणातील इंद्रायणी भात दुष्काळी टापूत

थोरात म्हणाले- या कायद्यांमध्ये व्यापाऱ्यांपासून शेतकऱ्याला संरक्षण न देण्याचं काम केंद्राने केलं. या कायद्यामुळे मोठ्या धनदांडग्या व्यापाऱ्यांना फायदा झाला. ते कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नव्हते. यामध्ये पंजाबच्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. कंत्राटी शेतीमध्येही यंत्रणा नव्हती. कायद्यात कंत्राटी शेतीबीबत नियमांची नोंद नव्हती.

स्वातंत्र्याला भीक म्हणणाऱ्यांना हे बक्षीस आहे. संघर्षातील राष्ट्र घडवण्यात पंजाबमधील शेतकऱ्यांचं मोठं योगदान आहे. शेतकरी आंदोलनाची जगानं नोंद घेतलीय, असे थोरात यांनी नमूद केले.

मोदी आणि भाजपने शेतकऱ्यांची, देशाची आणि मानवतेची पुढे येऊन माफी मागावी. आंदोलनात प्राण गमावलेल्या शेतकऱ्यांची जबाबदारी कुणाची? असाही प्रश्न थोरात यांनी उपस्थित केला. भाजपच्या कुटील राजकारणाला जनता फसणार नाही, असे खडेबोलदेखील थोरात यांनी यावेळी सुनावले.

Back to top button