Jai Bhim : सेंगानी- लिजोमोल जोस आहे रिअल लाईफमध्ये खूप सुंदर | पुढारी

Jai Bhim : सेंगानी- लिजोमोल जोस आहे रिअल लाईफमध्ये खूप सुंदर

पुढारी ऑनलाईन

जय भीम या चित्रपटात सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या सेंगानी विषयी तुम्हाला माहिती आहे का? जय भीममध्ये सेंगानी हिची व्यक्तीरेखा लिजोमोल जोस या अभिनेत्रीने साकारलीय. ती एक गर्भवती महिला दाखवण्यात आलीय. ती रिअल लाईफमध्ये खूप सुंदर आहे. तिच्याविषयी जाणून घेऊया ही खास माहिती.

No photo description available.

जय भीम चित्रपटात साऊथ अभिनेता सूर्या मुख्य भूमिकेत आहे. त्याने चंद्रू नावाच्या वकिलाची भूमिका साकारलीय. त्याचबरोबर, प्रकाश राज हा दिग्गज अभिनेतादेखील पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. पण खरी स्टार आहे ती लिजोमोल जोस.

No photo description available.

आदिवासी जमातीचा राजकन्नूच्या पत्नीची भूमिका लिजोमोल जोसने साकारलीय. न केलेल्या गुनह्याखाली पोलिस राजकन्नूला तुरुंगात डांबतात. त्याने गुन्हा कबूल करावा म्हणून मारहाण करतात. आपल्या पतीची सुटका व्हावी म्हणून सेंगानी प्रयत्न करते. चंद्रूकडे ही केस येते. समाजातील वास्तव दर्शन या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्यात आलं आहे. लिजोमोल जोस ही अखेरपर्यंत लढते.

No photo description available.

छोट्या करिअरची मोठी गोष्ट

लिजोमोलचे चित्रपट करिअर फारसे मोठे नाही. ती उत्तम अभिनेत्री आहे-ते जय भीम या चित्रटातून सिध्द झालंय. Maheshinte Prathikaaram (2016) या मल्याळम चित्रपटातून तिने चित्रपट करिअरला सुरूवात केली. ‘हनी बी’मध्येही (२०१७) ती दिसली.

May be an image of text that says "©DeRaN Photography"

तिचा हा चित्रपट गाजला होता. पुढे Sivappu Manjal Pachai, Theethum Nandrum असे काही तमिळ चित्रपट तिने काम केले आहेत. तिने अनेक मल्ल्याळम आणि तमिळ चित्रपट केले आहेत.

Street Lights (2018) मध्ये मामूट्टी (Mammootty) सोबत तिने काम केलं. यामध्ये साऊथ स्टार सिध्दार्थची मुख्य भूमिका होती. पुढे तिने तमिळ चित्रपट Theethum Nandrum मध्ये अभिनय केला.

याचवर्षी अडकली लग्नाच्या बेडीत

याचवर्षी ५ ऑक्टोबरला तिने अरूण अँथोनीसोबत लग्न केले. या कपलचे फोटो लिजोमोलच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पाहायला मिळतात.

 

No photo description available.

 

View this post on Instagram

 

A post shared by Lijomol Jose (@lijomol)

 

View this post on Instagram

 

A post shared by Lijomol Jose (@lijomol)

Back to top button