गोळीबार करून खून करणाऱ्या सहा जणांना अटक, मालेगाव पोलिसांना यश

मालेगावमध्ये गोळीबार करणाऱ्या सहा जणांना अटक
मालेगावमध्ये गोळीबार करणाऱ्या सहा जणांना अटक
Published on
Updated on

मालेगाव; पुढारी वृत्तसेवा : मुंबई – आग्रा महामार्गावर धावत्या वाहनावर गोळीबार अन् खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या गोळीबार प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. बकरी विक्रीसाठी चाललेल्यांना लुटीच्या उद्देशाने केलेल्या गुन्ह्यात सहा जणांना अटक झाली आहे. (दि.०८) जुलै रोजी पहाटे दरेगाव शिवारात जनता सायजिंगजवळ हे थरारनाट्य घडले होते.

बकरी विक्रीसाठी जाणाऱ्यावर गोळीबार

जामनेर येथील व्यापारी अलीम सलीम खाटीक हा त्यांच्या नातेवाईकांसह पिकअपमध्ये (एम.एच. ४८ ए.जी. ८७६१) बकरी ईद निमित्त कल्याणला बकरी विक्रीसाठी जात होता. पहाटेचे सुमारास पवारवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी त्यांना वाहन थांबविण्यास सांगितले.

अधिक वाचा : 

पिकअपचालक नितेश निकम व अलीम खाटीक यांना संशय आल्याने त्यांनी वाहन भरधाव वेगात पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पाठलाग करणार्‍या दुचाकीवर तिघांमध्ये बसलेल्या व्यक्तीने पिकअप कॅबिनच्या दिशेने गोळीबार केला. ती गोळी जावेद रज्जाक खाटीक यांच्या डोक्याच्या डाव्या बाजूस लागल्याने ते गंभीर जखमी झाले.

अधिक वाचा : 

हल्लेखोर गेले पळून

हल्लेखोरांनी पाठलाग सोडून पोबारा केला. याप्रकरणी अलीम खाटीक यांच्या फिर्यादीवरून पवारवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद होऊन तपास सुरु आहे. उपचारादरम्यान जखमी जावेद खाटीक यांचा मृत्यू झाल्याने पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली आहे.

पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी मालेगावसह शेजारील जिल्ह्यात तपास पथके रवाना केली आहेत.
गुन्हा करण्याच्या पध्दतीवरून संशयितांना पोलिसांनी काहींना अटक केली.

अधिक वाचा :

या सहा जणांना घेतले ताब्यात

हासिम पिंजारी उर्फ पापा गोल्डन, गोपाल गिरासे, सय्यद अबुजर, मकसुद अहमद उर्फ मत्से, मोहमद साजिद उर्फ मिर्ची, मोहमद अक्रम उर्फ मंथन चोरवा यांना ताब्यात घेण्यात आले आहे. उलट तपासणीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

गुन्हयात वापरलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. आरोपींनी बंदुकीचे तुकडे करून नदीत फेकले होते. तेदेखील जप्त करण्यात आल्याचे पोलिस तपासात सांगण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक वसंत भोये यांचे पथक कार्यरत आहे.

हे ही वाचा :

हे ही पाहा :

[visual_portfolio id="3970"]

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news