नेते, क्रिकेटरसोबत शरीरसबंधाला भाग पाडले; रियाज भाटी याच्या पत्नीचा आरोप | पुढारी

नेते, क्रिकेटरसोबत शरीरसबंधाला भाग पाडले; रियाज भाटी याच्या पत्नीचा आरोप

मुबंई, पुढारी ऑनलाईन

राजकारणी, हायप्रोफाइल लोक आणि क्रिकेटरबरोबर जबरदस्तीने संबंध ठेवायला भाग पाडल्याचा आरोप कुख्यात गुंड आणि दाऊद इब्राहिमचा साथीदार रियाज भाटी याच्‍या पत्नीने केला आहे. याप्रकरणाची तक्रार मुंबई पोलिसांत दिली आहे.

दोन दिवसांपूर्वी नवाब मलिक रियाज भाटी हा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर तो चर्चेत आला. भाटी हा कुख्यात गुंड असून त्याच्या मदतीने फडणवीस यांनी अनेक व्यवहार केल्याचा आरोप नवाब  मलिक यांनी केला हाेता. आता त्याच्या पत्नीने त्याच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

रियाजने तिला सेक्स वर्कर बनवून तिचा छळ केला असल्याचा आरोप तिने केला आहे. पती रियाझ भाटी याने हायप्रोफाईल लोक, राजकीय नेत्यांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले, असा आरोप त्‍याच्‍या पत्‍नीने केला आहे. तसेच एका क्रिकेटरनेही शारीरिक संबंध ठेवल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे.

मुंबईतील सांताक्रूझ पोलीस ठाण्यात २४ सप्टेंबर रोजी तिने तक्रार दिली होती. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.
एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार. गँगस्टर दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी भाटीच्या पत्नीने आरोप केला आहे की, तिच्या पतीने तिला हायप्रोफाइल लोकांशी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. तिने भाटीसह क्रिकेटर, राजकीय लोकांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. तिने दाखल केलेल्या तक्रारीत अनेक नामवंत व्यक्तींची नावे आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू असून अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.

रियाज भाटी पंतप्रधानांच्या कार्यक्रमात कसा?

मंत्री नवाब मलिक यांनी रियाज भाटी यांच्यावरून गंभीर आरोप केले हाेते . ते म्हणाले हाेते , ‘रियाज भाटी हा अंडरवर्ल्ड डाॅन दाऊदचा माणूस आहे. त्याला पंतप्रधानांच्या दौऱ्यात थेट प्रवेश दिला गेला. त्याचे पंतप्रधानांसोबत फोटो काढले गेले. रियाज भाटी हा विना पासपोर्ट विमानतळावर २०१५ अटक केली होती. तेव्हापासून ताे फरार आहे. फडणवीस भाटीच्या मदतीने वसुली रॅकेट चालवत होते. पंतप्रधानांच्या कार्यक्रमात जाण्यासाठी केंद्रीय आणि राज्य पातळीवरील यंत्रणा पूर्णपणे पडताळणी करतात. मात्र, रियाज भाटी हा दाऊदचा माणूस असून तो पंतप्रधानांसोबत कसा गेला. तो व्हायआयपी कक्षात कसा गेला? तो देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गेला, त्याला त्यांचे संरक्षण होते.’, असा आराेपही मलिक यांनी केला हाेता.

हेही वाचलं का? 

Back to top button