Nilesh Rane | निलेश राणे यांची राजकारणातून निवृत्ती; नेमकं काय झालं? | पुढारी

Nilesh Rane | निलेश राणे यांची राजकारणातून निवृत्ती; नेमकं काय झालं?

पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजप नेते आणि मंत्री नारायण राणे यांचे सुपूत्र निलेश राणे यांनी राजकारणातुन निवृत्ती घेत असल्याचे म्हटलं आहे. त्यांनी आपल्या ‘X’ अकाऊंटवर पोस्ट करत म्हटलं आहे की, “मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही. ” निलेश राणे याचे भाऊ नितेश राणे हे भाजपचे आमदार आहेत.

वाचा त्यांची पोस्ट त्यांच्याच शब्दांत. (Nilesh Rane)

Nilesh Rane : मला आता रस राहिला नाही

“नमस्कार, मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही.

मागच्या १९/२० वर्षामध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, कारण नसताना माझ्या सोबत राहिलात त्या बद्दल मी आपला खूप आभारी आहे. BJP मध्ये खूप प्रेम भेटलं आणि BJP सारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली त्या बद्दल मी खूप नशीबवान आहे. मी एक लहान माणूस आहे पण राजकरणात खूप काही शिकायला मिळालं आणि काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचं मनात घर करून गेले, आयुष्यात त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन. निवडणूक लढवणं वगैरे यात मला आता रस राहिला नाही, टीका करणारे टीका करतील पण जिथे मनाला पटत नाही तिथे वेळ स्वतःचा आणि इतरांचा वाया घालवणे मला पटत नाही. कळत नकळत मी काही लोकांना दुखावलं असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा. जय महाराष्ट्र!”

हेही वाचा 

Back to top button