मुंबई : एकनाथ शिंदेंची शेवटची फडफड सुरू, त्‍यांचा पुढचा मेळावा होणार नाही : संजय राऊत | पुढारी

मुंबई : एकनाथ शिंदेंची शेवटची फडफड सुरू, त्‍यांचा पुढचा मेळावा होणार नाही : संजय राऊत

मुंबई ; पुढारी ऑनलाईन बाळासाहेबांची शिवसेना ही सत्‍याचं प्रतिक आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा हा एकच आणि तोही शिवाजी पार्कवर होणार आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही नकली सेना आहे. शिंदेंची ही शेवटची फडफड सुरू, शिंदेंचा फुडचा मेळावा होणार नाही अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. आज (मंगळवार) सायंकाळी ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा आझाद मैदानावर होणार आहे. ठाकरे आणि शिंदे गट या दोघांकडून तोफा धडाडणार असल्‍याने सर्वांच्या नजरा या मेळाव्याकडे लागल्‍या आहेत.

ठाकरेंची शिवसेना ही खरी सेना आहे. शिंदेंची शिवसेना ही नकली सेना असल्‍याचे म्‍हणत राउतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर कडाडून टीका केली. एकनाथ शिंदे यांची शेवटची फडफड सुरू असून, त्‍यांचा पुढचा मेळावा होणार नसल्‍याची टीका त्‍यांनी यावेळी केली. अहंकाराचा नाश होईल, २०२४ ला ठाकरे सरकारच सत्‍तेत येईल असा विश्वास त्‍यांनी व्यक्‍त केला. दरम्‍यान फडणवीस गृहमंत्री असताना राज्‍यात ड्रग्‍ज येतातच कसे म्‍हणत संजय राऊत यांनी फडणवीसांवर टीका केली.

गाझात जे घडतंय ते आपल्‍याकडे मणिपूरमध्ये घडले. मणिपूर मुद्यावरून मोदी सरकारने पळ काढल्‍याची टीका करत त्‍यांनी केंद्रातील मोदी सरकारवरही टीका केली. यावेळी त्‍यांनी बाळासाहेबांची शिवसेना ही सत्‍याचं प्रतिक आहे. आम्‍ही दिल्‍लीश्वरांच्या अहंकाराचं दहन करणार असल्‍याचे ते म्‍हणाले.

हेही वाचा :

Back to top button