Sensex Today | बाजारात सपाटून विक्री, क्षणात उडाले २ लाख कोटी, नेमकं काय झालं? | पुढारी

Sensex Today | बाजारात सपाटून विक्री, क्षणात उडाले २ लाख कोटी, नेमकं काय झालं?

पुढारी ऑनलाईन : मध्य पूर्वेतील इस्रायल- हमास युद्धामुळे वाढलेला तणाव आणि तेलाच्या किमतीतील अस्थिरतेमुळे जगभरातील बाजारात विक्रीचा मारा झाला आहे. या पार्श्वभूमीवर आज गुरुवारी (दि.१९) सलग दुसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजारात घसरण झाली. आज सुरुवातीच्या व्यवहारात सर्वच क्षेत्रांत विक्री दिसून आली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स (Sensex Today) सुमारे ४७० हून अधिक अंकांनी घसरून ६५,४०० पर्यंत खाली आला. तर निफ्टी (Nifty50) १९,५३० वर होता. सकाळी ११ च्या सुमारास सेन्सेक्स ३६० अंकांच्या घसरणीसह ६५,५१५ वर तर निफ्टी १९,५६५ वर व्यवहार करत होता.

द इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, आज सुरुवातीच्या व्यवहारातील घसरणीमुळे बीएसई (BSE) वरील सर्व सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल २.१२ लाख कोटींनी कमी होऊन ते ३१९.२८ लाख कोटी रुपयांवर आले.

संबंधित बातम्या 

कोणते शेअर्स घसरले?

सेन्सेक्स काल ६५,८७७ वर बंद झाला होता. आज तो (Sensex Today) ६५,४८४ वर खुला झाला. त्यानंतर तो ६५,३४३ पर्यंत खाली आला. सेन्सेक्सवर विप्रोचा शेअर सर्वाधिक घसरला. हा शेअर ३ टक्क्यांनी घसरून ३९४ रुपयांपर्यंत खाली आला. या आयटी (IT) फर्मकडून सप्टेंबर तिमाहीतील निराशाजनक आकडे समोर आल्यानंतर त्यांचे शेअर्स घसरले.

त्यासोबत टाटा स्टील, बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, टाटा मोटर्स, टायटन, पॉवर ग्रिड, जेएसडब्ल्यू स्टील, कोटक बँक, सन फार्मा, आयसीआयसीआय बँक, टीसीएस, रिलायन्स, एसबीआय, ॲक्सिस बँक हे शेअर्स घसरले. तर केवळ इंडसइंड बँक आणि अल्ट्राटेक सिमेंट हे शेअर्स वाढले आहेत.

जागतिक बाजारही धडाम

आशियाई बाजारातही गुरुवारी घसरण दिसून आली. मध्य पूर्वेतील संघर्षाच्या वाढत्या चिंतेमुळे गुंत‍णूकदारांनी बाजारात जोखीम घेणे टाळले आहे. जपानचा निक्केई आज १.९ टक्क्यांनी आणि चीनचा शांघाय कंपोझिट १.२ टक्क्यांनी घसरला. दरम्यान, बुधवारी अमरिकेच्या बाजारातील निर्देशांकही घसरले होते. येथील तिन्ही प्रमुख निर्देशांक १ टक्क्यांहून अधिक घसरले.

हे ही वाचा :

Back to top button