दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक, ‘रिअ‍ॅल्टी’मधील ‘हे’ शेअर्स फायद्याचे

दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक, ‘रिअ‍ॅल्टी’मधील ‘हे’ शेअर्स फायद्याचे

इस्रायल-हमास युद्धाचा परिणाम बाजारावर केवळ एकच दिवस घडून आला. आणि अपेक्षेप्रमाणे बाजाराने हे तिन्ही मुख्य निर्देशांक 1 टक्का वधारून खालीलप्रमाणे बंद झाले.

निफ्टी -19751.05
निफ्टी बँक – 44287.95
सेन्सेक्स – 66282.74

निफ्टीचे मिड कॅप आणि स्मॉल कॅप इंडेक्सही याच प्रमाणात वधारले. इस्रायल-हमास युद्ध केवळ मध्यपूर्वेतील त्या प्रदेशातच लढले जाईल. आणि त्याचा परिणाम क्रूड ऑईल दरावर होणार नाही, हे स्पष्ट झाल्यामुळे पुढील तेजी घडून आली.

निफ्टी-रिअ‍ॅल्टी इंडेक्स या आठवड्यात 7 टक्के वाढला. गेले काही महिने या सेक्टरमधील गतीने वेग पकडला आहे. वाढते शहरीकरण, मध्यम वर्गाचा विस्तार आणि इन्फ्रास्ट्रक्चरमधील सुधारणा त्यांच्या जोडीने या सेक्टरमधील परकीय गुंतवणुकीचा ओघ आणि शासनाचे पाठबळ या गोष्टीमुळे रिअ‍ॅल्टी सेक्टरला येणारा भविष्यकाळ सुवर्णकाळ दाखवेल.

आज रिअ‍ॅल्टी सेक्टरचे भारताच्या GDP मधील योगदान 7.3 टक्के आहे, ते पुढील वीस वर्षांत दुप्पटीपेक्षा अधिक म्हणजे साडेपंधारा टक्के होऊन जवळपास 6 ट्रिलीयन डॉलर्स होईल.

असा जाणकारांचा अंदाज आहे. ज्यांना दीर्घ मुदतीसाठी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची आहे, त्यांनी रिअ‍ॅल्टी सेक्टरमधील खालील शेअर्सचा विचार करावा.

1) स्वान एनर्जी – सध्याचा भाव ……………….रु. 305.25
2) फिनिक्स मिल्स ……………. रु. 2014.60
3) डीएलएफ ………………रु. 568.40
4) प्रेस्टीज इस्टेट ………………रु. 716.05
5) गोदरेज प्रॉपर्टीज ……………….रु. 1688.20
6) सोभा ………………….रु. 762.50
7) ब्रिगेड एंटरप्राईजेस …………………रु. 621.40
8) लोढा (मॅक्रोटेक, डेव्हलपर्स) ……………….रु. 809.95
9) ओबेरॉय रिअ‍ॅल्टी ……………….रु. 1128.75

निफ्टी ऑटो इंडेक्सही आठवड्यात अडीच टक्क्यांनी वाढला. टाटा मोटर्सचा शेअर साडेआठ टक्क्यांनी वाढला. (रु. 667.10) सन 2023 च्या पहिल्या सहामाहीत GLR (Jaguar Land Rover) ने 97 टक्के विक्री वाढ YoY बेसिसवर नोंदवली, त्याचा हा परिणाम. डिसेंबर 2022 अखेरीस हा शेअर 77 टक्क्यांनी वाढला. शेअर बाजारात बरेच Promising Shares असतात. अशांच्या यादीत भारतामध्ये एचडीएफसी बँक, इन्फोसिस, टीसीएस, एलटी, एशियन पेंटस्, टाटा मोटर्स यांचा समावेश करावा लागेल.

टीसीएसचा शेअर संपूर्ण आठवडाभर चर्चेत राहिला. तिमाही आणि वार्षिक आणि आर्थिक निकालांची सुरुवात आयटी कंपन्यांच्या निकालांनी होते. आघाडीच्या कंपन्यांनी आपले निकाल जाहीर केले. 7 ते 8 टक्के उत्पन्नात वाढ आणि काहीशी तेवढीच निव्वळ नफ्यात वाढ तिन्ही कंपन्यांनी नोेंदवली.

टीसीएस शेअर्सचे Buyback हा मुद्दा शेअर चर्चेत राहण्यामागे होता. शुक्रवारचा शेअरचा बंद भाव आहे रु. 3574.30; परंतु कंपनीने रु. 4150 प्रती शेअर दराने 17000 कोटी रु. किमतीचे 4 लाख कोटींहून अधिक शेअर्स विकत घेण्याचे धोरण जाहीर केले आहे. सहा वर्षांतील हे पाचवे Buyback आहे.

Ircon Internation Ltd. ही भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत रेल्वे आणि महामार्ग कन्स्ट्रक्शन्समध्ये काम करणारी कंपनी आहे. तर Rites हीदेखील भारत सरकारच्या त्याच विभागांतर्गत काम करणारी कंपनी आहे. या दोन्ही कंपन्यांना 'नवरत्न कंपनी' हा दर्जा मिळाला. मागील एका वर्षात Ircon चा शेअर अडीचपट वाढला आहे. ज्यांना सावधतरीही लाभदायक गुंतवणूक करायची आहे, त्यांनी या शेअरमध्ये गुंतवणूक करावी.

Procter & Gamble Hygiene ही हेल्थकेअर सेक्टरमधील अत्यंत दर्जेदार कंपनी आहे. Head & Shoulders,Vicks, Pantene, Oral-B, Pampers, Whisper ही तिच्या काही उत्पादनांची यादी पाहिली तरी तिची गुणवत्ता लक्षात येते. रु. 17743 हा तिचा भाव आहे. कंपनीने प्रती शेअर रु. 105 म्हणजे 1050 टक्के अंतिम लाभांश दिला आहे. आर्थिक सुबत्ता असणार्‍या गुंतवणूकदारांनी या Heavy- Weight शेअरमध्ये अवश्य गुंतवणूक करावी.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news