Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्ग अपघातातील मृतांच्या कुटूंबियांना पीएम मोदींकडून २ लाखांची मदत जाहीर | पुढारी

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्ग अपघातातील मृतांच्या कुटूंबियांना पीएम मोदींकडून २ लाखांची मदत जाहीर

पुढारी ऑनलाईन डेस्क : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg Accident) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्य़ात आज (दि.१५) सकाळी झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटूंबियांना प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करत दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या : 

वैजापूर तालुक्यातील जांबरगाव शिवारात समृद्धी महामार्गावर उभ्या ट्रकला टेमो ट्रॅव्हलरने पाठीमागून दिलेल्या धडकेत १२ जण जागीच ठार झाले. तर १८ जण जखमी झाले आहेत. मृतात ५ पुरुष ६ महिला व एका बालकाचा समावेश आहे. ट्रॅव्हलमधील नाशिकचे भाविक सैलानी बाबाच्या दर्शनासाठी बुलढाणा येथे गेले होते. दर्शन करून परतत असताना हा भीषण अपघात झाला. या अपघातातील मृतांबद्दल पंतप्रधान मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. “अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे दु:ख झाले आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले त्यांच्यासोबत माझे विचार आहेत. जखमींना लवकरात लवकर बरे व्हावे अशी माझी इच्छा आहे. प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना PMNRF कडून २ लाख रुपये दिले जातील, तर जखमींना ५० हजार रूपयांची मदत दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा : 

Back to top button