Central Railway : मध्य रेल्वेने ६ महिन्यांत ७३३ मुलांची केली सुटका

Central Railway : मध्य रेल्वेने ६ महिन्यांत ७३३ मुलांची केली सुटका
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मध्य रेल्वेच्या (Central Railway) रेल्वे संरक्षण दलाने (RPF) "ऑपरेशन नन्हे फरिश्ते" अंतर्गत गेल्या ६ महिन्यांत ७३३ मुलांची सुटका केली आहे. एप्रिल २०२३ ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत रेल्वे पोलीस आणि इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचारी यांच्या समन्वयाने या मुलांची सुटका केली आहे. यामध्ये ५१७ मुले आणि २१६ मुलींचा समावेश आहे आणि चाइल्डलाइन सारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने त्यांचे पालकांशी पुनर्मिलन झाले आहे.

संबंधित बातम्या : 

रेल्वे सुरक्षा दलाकडे रेल्वे मालमत्ता, प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. "ऑपरेशन नन्हे फरिश्ते" अंतर्गत मुलांना वाचवण्याची जबाबदारीही ते पार पाडत आहे. (Central Railway)

  • मध्य रेल्वेच्या (Central Railway) मुंबई विभागाने सर्वाधिक २०६ मुलांची सुटका केली, ज्यात १३९ मुले आणि ६७ मुलींचा समावेश आहे.
  • भुसावळ विभागाने २०५ मुलांची सुटका केली असून त्यात १२८ मुले आणि ७७ मुलींचा समावेश आहे.
  • पुणे विभागाने १८८ मुलांची सुटका केली असून यामध्ये १८१ मुले आणि ७ मुलींचा समावेश आहे.
  • नागपूर विभागाने सुटका केलेल्या ९५ मध्ये ४७ मुले आणि ४८ मुलींचा समावेश आहे.
  • सोलापूर विभागाने ३९ मुलांची सुटका केली ज्यामध्ये २२ मुले आणि १७ मुलींचा समावेश आहे.

"मिशन जीवन रक्षा" मध्ये आरपीएफचे जवान स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवत आहेत. सप्टेंबर २०२३ मध्ये आरपीएफ जवानांनी ३ मौल्यवान जीव वाचवले.

ऑपरेशन "अमानत" अंतर्गत १२८ वस्तू केल्या सुपूर्द

बरेच प्रवासी ट्रेनमध्ये चढण्यासाठी किंवा ट्रेन किंवा स्टेशन सोडण्याच्या घाईत सामान किंवा मोबाइल यांसारखे सामान विसरतात. या ऑपरेशन अंतर्गत आरपीएफ कर्मचारी अशा वस्तू सुरक्षित करण्यात मदत करतात आणि योग्य मालकाला परत मिळवून देतात. या ऑपरेशन अंतर्गत आरपीएफ ने सप्टेंबर २०२३ मध्ये अंदाजे ३९ लाख ५१ हजार ९३५ रूपयांपेक्षा जास्त किमतीच्या १२८ वस्तू परत दिल्या.
तसेच सप्टेंबर २०२३ मध्ये, आरपीएफने २३ लाख ७५ हजार ८४० किमतीचे ९५.२०० किलो गांजाचे ९ प्रकरणे आणि ७५ हजार १५० रूपये किमतीची (१३४.१९ लिटर) ९ मद्य प्रकरणे नोंद केली. मध्य रेल्वेने ३ जणांच्या अटकेसह ४८३ कासवांच्या वन्यजीव जप्तीचे १ प्रकरण देखील जप्त केले आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news