Maharashtra NIA Raids | विक्रोळी पार्कसाइट येथे एनआयएचा छापा, पण वाहिद शेख यांनी दरवाजा उघडलाच नाही | पुढारी

Maharashtra NIA Raids | विक्रोळी पार्कसाइट येथे एनआयएचा छापा, पण वाहिद शेख यांनी दरवाजा उघडलाच नाही

विक्रोळी; पुढारी वृत्तसेवा : पीएफआय संघटना प्रकरणात एनआयए आज (दि.११) देशभरात ठिकठिकाणी छापेमारी करीत आहे. विक्रोळी पार्क साईट येथील ७/११ रेल्वे बॉम्बस्फोटातील निर्दोष आरोपी वाहिद शेख यांच्या घरी एनआयएचे पथक पहाटे पोहचले आहे. मात्र वाहिद शेख याने दरवाजा उघडला नाही. जोपर्यंत योग्य नोटीस दाखवत नाही, तोपर्यंत दरवाजा उघडणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. त्यामुळे एनआयएचे पथक आणि पोलीस त्यांच्या घराबाहेर ठाण मांडून बसले आहेत.

संबंधित बातम्या : 

अब्दुल वाहिद शेख हे रेल्वे बॉम्ब स्फोट प्रकरणी अटकेत होते. मात्र त्यांची २०१५ मध्ये त्याचीनिर्दोष मुक्तता झाली. त्यानंतर ते शिक्षक म्हणून काम करीत आहेत. त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतले आहे. आता त्यांच्या घरी पत्नी आणि दोन लहान मुले आहेत. पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास विक्रोळी पार्कसाइट येथील सहा नंबर रस्त्यावर असलेल्या त्यांच्या घरी एनआयएचे पथक दाखल झाले. मात्र वहिद यांनी दरवाजा उघडला नाही. शेवटी मुंबई पोलिसांची मदत एनआयए पथकाने घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पाच तास उलटूनही वाहीद यांनी दरवाजा उघडलेला नाही. वाहिद यांचे वकील इब्राहम हार्बट हे दाखल झाले असून अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांच्याकडे योग्य कागदपत्रे नसल्याचे त्यानी सांगितले आहे. त्यामुळे आता एनआयए आणि पोलीस पुढे काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा : 

Back to top button