पुढारी ऑनलाईन : भारतातील मोस्ट वाँटेड जैशचा दहशतवादी शाहिद लतीफ (Shahid Latif) याची पाकिस्तानातील (Pakistan) सियालकोटमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. शाहिद लतीफ हा पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचा (Pathankot Terror attack) मास्टरमाईंड होता. शाहिद लतीफ हा प्रतिबंधित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद (JeM) चा सदस्य होता. २ जानेवारी २०१६ रोजी झालेल्या पठाणकोट हल्ल्याचा मुख्य सूत्रधार होता. त्याने सियालकोट येथून हल्ल्याचे सुत्रे हलवली होती आणि त्याने जैशच्या चार दहशतवाद्यांना पठाणकोट येथे हल्ल्यासाठी पाठवले होते.
संबंधित बातम्या
बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत (UAPA) दहशतवादाच्या आरोपाखाली नोव्हेंबर १९९४ मध्ये त्याला भारतात अटक करण्यात आली होती. त्याच्यावर खटला चालवण्यात आला आणि त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती. भारतात शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्याला २०१० मध्ये वाघा बॉर्डर मार्गे पाकिस्तानात पाठवण्यात आले होते.
लतीफवर १९९९ मधील इंडियन एअरलाइन्सच्या विमानाच्या अपहरणाचाही आरोप होता. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) च्या तपासात असे म्हटले होते आहे की लतीफ (Shahid Latif) २०१० मध्ये सुटल्यानंतर पाकिस्तानमधील जिहादी गटात सामील झाला होता. भारत सरकारने त्याला वाँटेड दहशतवादी घोषित केले होते.
२ जानेवारी २०१६ रोजी सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात सुमारे १७ तास चकमक चालली होती. यात पाच हल्लेखोर ठार झाले होते. तर सहा सुरक्षा कर्मचारी शहीद झाले होते. त्यानंतर रुग्णालयात दाखल केलेले आणखी तीन जखमी जवान शहीद झाले होते. त्यामुळे सुरक्षा दलाच्या शहीद जवानांची संख्या ९ झाली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आयईडी स्फोटात सुरक्षा दलाचा आणखी एक अधिकारी शहीद झाला होता. पठाणकोटमधील कारवाई ४ जानेवारी रोजीही सुरू राहिली होती आणि पाचव्या हल्लेखोराला ठार केले होते.
हे ही वाचा :