नाशिकमध्ये ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त, मुंबई पोलिसांची कारवाई | पुढारी

नाशिकमध्ये ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त, मुंबई पोलिसांची कारवाई

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क, नाशिकमध्ये मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांनी नाशिकमध्ये ड्रग्ज बनविणा-या कारखान्यावर छापा टाकला आहे. ड्रग तस्कर ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटीलचा नाशिक येथील ड्रग्ज निर्मितीचा कारखाना उद्धस्त करण्यात आला असून या कारवाईत कोट्यावधी रुपयांचे ड्रग्ज मुंबई पोलिसांच्या हाती लागल्याचे समजते.

नाशिकमधील श्री गणेशाय इंडस्ट्रीज या कंपनीत ड्रग्ज बनविण्याचे काम सुरु होते. ड्रग्ज माफिया ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील याचाच यात हात असल्याचे पोलिसांना समजले. साकी नाका पोलिसांच्या तब्बल तीन दिवस सुरु असलेल्या कारवाईत कंपनी मालकासह कामगारांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर दीडशेहुन अधिक किलो ड्रग्ज बनविण्याचा कच्चा माल पोलिसांनी जप्त केला आहे.

काही दिवसांपूर्वीच ड्रग्ज माफिया ललित पाटील पुण्यातील ससून रुग्णालयातुन पोलिसांच्या हाती तुरी देऊन फरार झाल्यानंतर ड्रग्ज विरोधी कारवाईसाठी पोलीस ॲक्शन मोडवर होते. त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या कारवाई नंतर राज्यातील ड्रग्जचं मोठं रॅकेट समोर येण्याची शक्यता आहे.

Back to top button