Sharad Pawar : भाजपकडे बहुमत होते, तर माझ्या शिफारशीची गरज का वाटली?

Sharad Pawar : भाजपकडे बहुमत होते, तर माझ्या शिफारशीची गरज का वाटली?

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : 'भाजपला चांगल्या जागा मिळाल्या होत्या. त्यांना बहुमत मिळालेले होते, तर त्यांना राष्ट्रपती राजवट लावण्यासाठी माझ्या शिफारशीची गरजच का भासली, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला आहे. मुंबईत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात पवार बोलत होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची सूचना शरद पवार यांनी केली होती, असे वक्तव्य फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले होते.

संबंधित बातम्या : 

त्यावर उत्तर देताना पवार (Sharad Pawar) म्हणाले, भाजपकडे बहुमत असताना राष्ट्रपती राजवट लावण्याबाबत ते माझे किंवा इतर कोणाचे का ऐकत होते, असा सवाल करत पवार यांनी फडणवीस यांच्या दाव्यातील हवा काढण्याचा प्रयत्न केला. मी काही सरकारमध्ये नव्हतो. सरकारमध्ये भाजप होते. राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंदर्भातील निर्णय त्यांचा होता. अशावेळी त्यांनी मला किंवा इतर कोणालाही याबाबत विचारले, तर त्याला आम्ही का नाही म्हणावे? मला आणखी एक गोष्ट विचारायची आहे. त्यांना स्पष्ट बहुमत मिळालेले असताना ते मला का विचारत होते, असा सवाल उपस्थित करत पवार यांनी फडणवीस यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न केला.

अमित शहा, नरेंद्र मोदी आणि फडणवीस यांच्याशी तुमची पडद्यामागे बोलणी सुरू होती, असे फडणवीस म्हणाले होते. त्यावर पवार म्हणाले, ते पूर्णपणे चुकीची माहिती देत आहेत. त्यांचे अधिक आमदार निवडून आलेले असताना ते माझे किंवा इतर कोणाचे का ऐकत होते, असे विचारत पवारांनी फडणवीसांनाच खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news