कारखान्यावरील कारवाईबाबत शिंदे गटातील नेत्याने दिलेली माहिती इंटरेस्टींग : रोहित पवार | पुढारी

कारखान्यावरील कारवाईबाबत शिंदे गटातील नेत्याने दिलेली माहिती इंटरेस्टींग : रोहित पवार

पुढारी ऑनलाईन : आमदार रोहित पवार सध्या चर्चेत आहेत ते बारामती ॲग्रोवरील कारवाईमुळे. महाराष्ट्र प्रदूषण विभागाने मध्यरात्री 2 वाजता बारामती ॲग्रोला नोटिस पाठवली.  72 तासात हा प्लांट बंद करण्याच्या सूचना नोटीसच्या माध्यमातून देण्यात आली. या कारवाईनंतर रोहित पवार यांनी x या प्लॅटफॉर्मवरून पोस्ट लिहीत द्वेष भावनेने ही कारवाई केली जात असल्याचं म्हटलं होतं.
यानंतर अजित पवारांनी या कारवाईला राजकीय स्वरूप देऊ नये असे आवाहनही केलं होतं.

या घडामोडी दरम्यान आताही त्यांच्या एका पोस्टने लक्ष वेधलं आहे. X या प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये ते म्हणतात, “ माझ्या कारखान्यावरील कारवाईबाबत शिंदे गटातील एका नेत्याने दिलेली माहिती इंटरेस्टींग आहे. या कारवाईमागे राज्यातील एका नेत्याबाबतचा अंदाज योग्य होता, पण दुसऱ्या नेत्याविषयी ऐकूण जरा आश्चर्यच वाटलं. केवळ राजकीय द्वेश या एकमेव कारणामुळं माझ्या कारखान्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न झाला नाही तर याव्यतिरीक्तही अनेक कारणं आहेत. त्यामुळं भविष्यात ही केस लढायला शासनाकडून बड्या वकीलांची फौज उभी केली जाईल, जी सामान्य लोकांची बाजू मांडण्यासाठी कधीही उभी केली जात नाही. पण तरीही मी डगमगणार नाही. कितीही त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी पूर्ण ताकदीनीशी लढेल. कुणापुढे झुकणार नाही, कारण माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे!”

हेही वाचा :

Back to top button