मुंबई : मोरबे धरणाने गाठली १०० टक्के पाणी पातळी; धरणाचे दोन दरवाजे उघडले | पुढारी

मुंबई : मोरबे धरणाने गाठली १०० टक्के पाणी पातळी; धरणाचे दोन दरवाजे उघडले

नवी मुंबई : पुढारी वृतसेवा : यावर्षी धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने नवी मुंबई महापालिकेच्या मालकीचा प्रतिदिन ४५० दलघमी. क्षमतेचा मोरबे धरण प्रकल्प संपूर्ण १००% भरला आहे. ८८ मीटर ही जलसाठ्याची सर्वोच्च पाणी पातळी पार केल्याने आज रविवारी (दि. २४ सप्टेंबर ) रोजी रात्री दिड वाजता धरणाचे दोन्ही दरवाजे १५ से.मी. उघडण्यात आलं आहेत. तर धरणातून ६७५ क्युसेकने विसर्ग सुरु झाला आहे.

संबधित बातम्या 

यावर्षी मोरबे धरण प्रकल्प क्षेत्रात आजतागायत ३५४०.०० मिमी. पावसाची नोंद झाली असून सद्यस्थितीत १९०.८९० दलघमी. पाणी साठा उपलब्ध होऊन मोरबे धरण पूर्ण भरले आहे. यावर्षी उत्तम पर्जन्यवृष्टीमुळे मोरबे धरण संपूर्ण क्षमतेने भरले असून गणेशोत्सवामध्ये नवी मुंबईकरांना मिळालेली ही मोठी भेट असल्याचे सांगत पाणी टंचाईचा प्रश्न मिटणार असल्याचे महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सांगितले.

हेही वाचा : 

Back to top button