मुंबई : निपाहची खबरदारी आरोग्य विभाग अलर्ट मोडवर | पुढारी

मुंबई : निपाहची खबरदारी आरोग्य विभाग अलर्ट मोडवर

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : ताप, डोकेदुखी, झोपाळूपणा, मानसिक गोंधळ उडणे, बेशुदध पडणे अशी लक्षणे असणारा कोणताही रुग्ण आणि जपानी मेंदुज्वर अथवा इतर मेंदुज्वराकरता निगेटिव्ह आहेत. मागील दोन आठवडयात निपाह बाधित भागामध्ये विशेषत: केरळ, ईशान्य भारतात अथवा बांगला देश सिमेलगतच्या भागात प्रवासाचा इतिहास असल्यास कोणत्याही रुग्णास संशयित निपा विषाणू रुग्ण म्हणून गृहित धरून या रुग्णास विलगीकरण कक्षात भरती करावे. तसेच नमुना एन आय व्ही प्रयोगशाळेकडे पाठविण्यात यावेत, अशा सूचना राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

केरळमध्ये निपा विषाणूजन्य आजाराचे रूग्ण आढळले असून दोन रूग्णांचा मृत्यूही झालेला आहे. या पाश्र्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागाकडून राज्यातील सर्व जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने सावध राहून ए. ई. एस. रुग्णांचे सर्वेक्षण करण्याची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले आहे.

निपाह विषाणूचा प्रसार

या विषाणूचा प्रसार हा मुख्यतवे फळांवर जगणा-या वटवाघळयाच्या (Fruit Bats) मार्फत होतो. वटवाघळयाणी अर्धवट खालेली फळे हाताळयाने अथवा खाल्याने हा आजार होतो. डुक्कर आणि इतर पाळीव प्राणी यांना देखील यांची बाधा होऊ शकते. १९९८ च्या मलेशियातील उद्रेकात वराहपालन करणारे शेतकरी मुख्यत्वे बाधित झाले होते.निपा विषाणूची लागण माणसापासून माणसास होवू शकते रुग्णांवर उपचार करणारे वैदयकीय कर्मचारी, रुग्णसेवा करणारे नातेवाईक यांना लागण होवू शकते.

वटवाघळाच्या स्त्रावामुळे दूषीत झालेला खजुराच्या झाडाचा रस पिल्याने देखील या विषाणूचा प्रसार होतो. आजरामध्ये मृत्युचे प्रमाण ४० ते ७० टक्के आहे.या आजाराचा कालावधी ५ ते १४ दिवसांचा आहेडॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचा-यांनी रुण उपचार आणि शुश्रुषा करतांना जागतिक आरोग्य संघटणेच्या Universal Precautions नुसार आवश्यक खबरदारी घ्यावी. रुग्ण व्याख्या आणि सॅम्पल कसे घ्यावे? याबाबत माहिती दिली असून आरोग्य विभागाने या अनुषंगाने पशुसंवर्धन विभागाशी आपापल्या स्तरावर समन्वय साधण्याच्या सूचनाही पत्रकाद्वारे दिल्याचे साथरोग सहसंचालक डॉ प्रतापसिंह सारणीकर यांनी सांगितले.

लक्षणे –

अंगदुखी,ताप, डोकेदुखी, झोपाळूपणा,

मानसिक गोंधळ उडणे,
बेशुदध पडणे

 

उपचार

निपा विषाणू आजारावर कोणतेही विशिष्ट औषध नाही. रॉबविरिन हे विषाणूविरोधी औषध वापरले जात असले तरी मुख्यत्वे लक्षणा आधारे उपचार आणि सहाय्यभूत शुश्रूषा ( Supportive Care ) यावर भर दिला जातो.

निदान

निपा विषाणूच्या निदानासाठी आर टी सी पी आर पदधतीने घसा, नाकस्त्राव, मूत्र रक्त हया नमुन्यांची तपासणी राष्ट्रीय विज्ञान संस्था, पुणे येथे करण्यात येते

प्रतिबंधात्मक खबरदारी

शेतात , जंगलात अथवा इतरत्र पडलेले फळे खाणे टाळावे.

हेही वाचंलत का?

Back to top button