पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबत उद्धव ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर आज (दि. १८) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. ठाकरे गटाने १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी लवकर निर्णय घ्यावा, याबाबत दाखल केलेल्या याचिकेवरही ही सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी निवडणूक आयोगाचा निकाल चुकीचा आहे. विधानसभा अध्यक्षांकडून योग्य वेळेत निर्णय देणे गरजेच असताना न्याय देण्यात विलंब का होत आहे? असा सवाल केला आहे. दिल्ली येथे आज माध्यमांशी ते बोलत होते.
संबंधित बातम्या :
यावेळी खासदार देसाई म्हणाले की, विधीमंडळाच्या नियमाप्रमाणे अध्यक्षांजवळ कागदपत्रे आणि याचिका दिल्यानंतर ती त्या त्या संबंधीत ठिकाणी पोहचवण्याचं काम त्या कार्यालयाकडून होत असतं. आम्ही न्याय मागत आहे. पण न्याय देण्यात विलंब होत आहे. अध्यक्षांनी योग्य वेळेत निर्णय देणे गरजेच होतं. राज्यात कायदा आहे की कायद्यावीना राज्य सुरू आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ११ मे च्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयात सर्व काही दिलं असताना पडळताळणी कसली करता, आतापर्यंत निर्णय घ्यायला पाहिजे होता. आज आमची बाजू कोर्टात मांडणार आहे. तीन लाख पदाधिकाऱ्यांची शपथपत्रे विधीत नमुन्यामध्ये निवडणूक आयोगाला दिली आहेत. लोकशाही ही सर्वोच्च असून भारत देश लोकशाहीची जननी आहे. त्याप्रमाणे न्याय देणे गरजेच आहे आणि या न्यायाकडे सर्वांचे लक्ष आहे, असे देसाई यांनी म्हटले आहे.
हेही वाचा :