पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबत उद्धव ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर आज (दि. १८ सप्टेंबर ) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. ठाकरे गटाने १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी लवकर निर्णय घ्यावा, याबाबत दाखल केलेल्या याचिकेवरही सुनावणी होणार आहे. यासंदर्भात माध्यमांशी बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, "केवळ वेळकाढूपणा सुरु आहे, पण आम्हाला सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळेल." (Sanjay Raut)
संबंधित बातम्या :
सत्तासंघर्षाच्या निकालात आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते. या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत अध्यक्षांनी लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी करणारी याचिकाही ठाकरे गटाच्या वतीने दाखल केली होती. त्या याचिकेवरही आज सुनावणी होणार आहे. याबाबत संजय राऊत म्हणाले, " सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमाेर शिवसेना ठाकरे गटाच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे; पण सरकारचा वेळ काढूपणा सुरु आहे. हे विधिमंडळ, संविधान आणि कायद्याशी केलेली बेईमानी आहे. गेले वर्षभर महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकार चालवल जात आहे. सहा महिन्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने आदेश देवूनही सुनावणी घेतली जात नाही, निर्णय घेतला जात नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काय केलं, असा सवालही त्यांनी केला.
हेही वाचा